घरताज्या घडामोडीकेवायसी अपडेटच्या नावाखाली चार लाख अकरा हजारांना गंडा

केवायसी अपडेटच्या नावाखाली चार लाख अकरा हजारांना गंडा

Subscribe

इगतपुरीत एचडीएफसी बँक क्रेडीट कार्ड खात्यातून रक्कम काढून घेत फसवणूक केल्याची घटना

इगतपुरी : ‘केवायसी अपडेट करायवयाचे आहे, याकरीता १० रुपये पाठवावे लागतील.. यासाठी लिंक पाठवत आहे’ असा मेसेज एकाला पाठवून मेसेजवर क्लिक करायला लावून सुमारे ४ लाख अकरा हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार इगतपुरीत घडला. एचडीएफसी बँक क्रेडीट कार्ड खात्यातून रक्कम काढून घेत फसवणूक केल्याची घटना इगतपुरीत दि. २४ रोजी घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या घटनेबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव सदो येथील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम चालू असून येथे नोकरीस असलेले रामा अंजनेय रेड्डी (वय ५४, मुळ रा. तिरुपति, जि. चितौर, हल्ली रा. साईलीला बिल्डींग, खालची पेठ, इगतपुरी) यांना दि. २३ रोजी सांयकाळी साडेसहा वाजता त्यांच्या मोबाईलवर केवायसी अपडेट करण्यासाठी संदेश आला. त्यात आपले केवायसी अपडेट करण्यासाठी १० रुपये लागतील असे सांगितले. यासाठी रेड्डी यांनी संदेशातील मोबाईल क्रमांकावर दुसऱ्या दिवशी फोन केला असता संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीने फोनपे बाबत माहिती सांगुन रेड्डी यांचा बँक पासबुक नंबर व क्रेडीट कार्डचा पिन क्रमांक विचारला असता रेडूी यांनी क्रेडिट कार्डचा पिनकोड क्रमांक सांगितला. यानंतर संबधित व्यक्तीने त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून ९६ हजार २३५ रुपये तीन वेळा काढले. तर ९७ हजार २४८ एक वेळा क्रेडीटकार्डच्या क्रमांकाद्वारे व २५ हजार २२१ रुपसे स्टेट बँक खात्यातुन अशी एकुण ४ लाख ११ हजार १७४ रुपयाची रक्कम काढून घेतली. याबाबत रेड्डी यांनी आपल्या खात्यातून रक्कम कमी होत आहे असे संबंधित व्यक्तीला सांगितले असता त्याने म्हटले की पुन्हा रक्कम खात्यात जमा होईल. मात्र, प्रक्रीया पूर्ण होताच संबंधिताने रेडडी यांना सांगितले की तुमची फसवणूक झाली आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, यावर रेड्डी यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची सर्व माहिती सांगून लेखी फिर्याद दिल्याने या गुन्हयाची नोंद करीत पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी सायबर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -