धक्कदायक! चार महिन्याच्या गोंडस मुलीला झाडाखाली ठेवले आणि…

चार महिन्याच्या गोंडस मुलीला झाडाखाली ठेवल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

four month abandoned girl child found in pune police registered complaint against unknown women
धक्कदायक! चार महिन्याच्या गोंडस मुलीला झाडाखाली ठेवले आणि...

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चार महिन्याच्या बाळाला झाडाखाली ठेवून अज्ञात महिला पसार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील चांदणी चौकात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोथरुड पोलिसांनी धाव घेत तात्काळ त्या गोंडस बाळाला ताब्यात घेऊन एका संस्थेकडे सोपवले आहे.

नेमके काय घडले?

कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार; पुण्यातील चांदणी चौकात एका लहान मुलीला झाडाखाली सोडून एक महिला निघून गेल्याचे पोलिसांनी समजले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचत मुलीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बाळाची प्रकृती सध्या चांगली असून बाळाला एका ससूनमधील संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, ही बाळाची आईच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! पिंपरी – चिंचवडमध्ये १०८ नवे कोरोना रुग्ण