घरCORONA UPDATEकोरोनासाठी चार टप्प्यात रुग्णालयांची विभागणी; राज्यभर 'फिव्हर क्लिनिक्स' - मुख्यमंत्री

कोरोनासाठी चार टप्प्यात रुग्णालयांची विभागणी; राज्यभर ‘फिव्हर क्लिनिक्स’ – मुख्यमंत्री

Subscribe

अनावधनाने कोरोनाग्रस्त रुग्णालयामध्ये गेला तर संपुर्ण रुग्णालयाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ही विभागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनासाठी चार टप्प्यात रुग्णालयांची विभागणी केली जाणार असल्याची माहिती दिली. सर्दी, खोकला, ताप असणाऱ्यांना क्युअर क्लिनिकमध्ये जावं लागणार आहे. सौम्य लक्षणं दिसणाऱ्यांसाठी एक रुग्णालय असेल. मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना तिसऱ्या रुग्णालयात जावं लागणार आहे. सौम्यपेक्षा जास्त लक्षणं असतील तर त्यासाठी सुसज्ज असे कोविड रुग्णालय असेल. अनावधनाने कोरोनाग्रस्त रुग्णालयामध्ये गेला तर संपुर्ण रुग्णालयाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ही विभागणी केली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

डॉक्टरांना पीपीई किट नसल्याला आरोप केला जात आहे. पण या उपकरणांचा जगभर तुटवडा आहे. अमेरिका देखील आपल्याकडे औषध मागत आहे. व्हेटिंलेटरचा तुटवडा आहे. पण सुदैवाने आपल्याला अजून त्याची गरज भासलेली नाही. विषाणू प्रूफ गणवेष बनविण्याची सुरुवात आपल्या राज्यातच होत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, जीवनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडत असाल तर मास्क वापरावा लागेल. कारण हा विषाणू कुठून कसा येईल, सांगता येत नाही. तथापि, हा मास्क विकत घेण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी देखील मास्क बनवू शकता. वापरलेला मास्क सुरक्षित जागी तुम्ही जाळून टाकले तर उत्तम, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – पीपीई म्हणजे काय? कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना का महत्वाचे आहे?


…तर शिव भोजन थाळ्यांची संख्या वाढवणार

राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे गरीब, मजूरांचे जेवणाचे हाल होत आहेत. राज्यात कोणी उपाशी राहू नये यासाठी शिव भोजन थाळ्यांची संख्या वाढवली होती. दरम्यान, आता लॉकडाऊन वाढलं तर शिव भोजन थाळ्यांची संख्या वाढवणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. जात-धर्म-पंथ विसरुन सर्वच राज्यांच्या मजूरांसाठी जेवणाची सोय केली जात आहे. साडेपाच-सहा लाख लोकांना सरकार अन्न पुरवतंय. दिवसभरात तीनवेळेच्या जेवणाची सोय सरकारने केली आहे. माणुसकीच्या नात्यातून गरजूंसाठी अन्नछत्राची सोय केली आहे.

- Advertisement -

शिवाय, केंद्राकडून अन्न-धान्याची मदत मिळाली आहे. मात्र केशरी कार्डधारकांसाठी आपल्याला मदत मिळालेली नाही. शहरी आणि ग्रामीण भागात १ लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी काहीतरी दिले पाहीजे, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे. केंद्राची योजना फक्त अन्न सुरक्षा योजनेतील लोकांसाठी आहे. त्यातही फक्त तांदूळ दिले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -