Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुंबई पोलीस दलातील चार बड्या अधिकाऱ्यांच्या मुंबईबाहेर बदल्या; चर्चेला उधाण

मुंबई पोलीस दलातील चार बड्या अधिकाऱ्यांच्या मुंबईबाहेर बदल्या; चर्चेला उधाण

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस दलात एकेकाळी ज्या अधिकाऱ्याची गुंड टोळ्यावर दहशत होती, अशा मुंबई गुन्हे शाखेतील टॉप अधिकाऱ्याची मुंबई बाहेर बदली करण्यात आल्यामुळे मुंबई पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे. पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, केदारी पवार, नंदकुमार गोपाळे आणि सचिन कदम यांची बदली करून त्यांना मुंबईबाहेर पाठविण्यात आले आहे.

सुधीर दळवी, नंदकुमार गोपाळे, सचिन कदम आणि केदारी पवार असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. हे चारही अधिकारी मुंबईतील टॉप पोलीस अधिकारी म्हणून त्याची ओळख होती. विशेष म्हणजे हे अधिकारी बराच काळ गुन्हे शाखेत कार्यरत होते, मात्र काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेतल्या अधिकाऱ्याबरोबर यांच्याही बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा यांच्या बदल्या करण्यात आल्यात.

- Advertisement -

तसेच ठाण्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना देखील मुंबईच्या बाहेर टाकण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहे. सुधीर दळवी यांची बदली नानविज येथे पोलीस प्रशिक्षण केंन्द्रात करण्यात आली असून नंदकुमार गोपाळे यांना जालना पोलीस प्राशिक्षण केंद्र येथे पाठवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक केदारी पवार यांची बदली जळगाव जातप्रमाणपत्र पडताळणी समिती येथे करण्यात आली आहे, तसेच पोलीस निरीक्षक सचिन कदम यांना औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -