घरक्राइममाजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या अवमानाचे प्रकरण

उल्हासनगर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याने आणि सामाजिक शांतता भंग होईल, असे वक्तव्य ट्वीटरमधून केल्याच्या आरोपावरून प्रकरणी परिमंडळ चार मधील चार पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार आनंद परांजपे आणि त्यांच्या सात सहकांर्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे उल्हासनगर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे आणि त्यांचे सहकारी हेमंत वाणी, निलेश सावंत, राजु चापले, रविंद्र पालवे, सुजाता घाग, विक्रम घाग आणि कैलास कल्लहोळे यांनी ठाणे येथे विना परवानगी एकत्र येऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांची बदनामी होईल, त्यामुळे दंगा घडून येईल शांतता भंग होईल अशा प्रकारच्या घोषणा दिल्या.

- Advertisement -

हा व्हिडियो ट्विटरच्या माध्यमातून सोशल मिडीयावर प्रसारित करुन तक्रारदार आणि इतर कार्यकर्त्यांचा आणि राज्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या बद्दल उल्हासनगर पोलिस ठाण्यात प्रमोद पांडे, मध्यवर्ती पोलिस ठाण्यात जयकुमार केणे, अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात विकास सोमेश्वर तर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुभाष साळुंके यांच्या तक्रारीवरुन गुन्हे दाखल झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -