घरताज्या घडामोडीधक्कादायक! नांदेडमध्ये शिक्षकांचा विद्यार्थीनीवर बलात्कार

धक्कादायक! नांदेडमध्ये शिक्षकांचा विद्यार्थीनीवर बलात्कार

Subscribe

नांदेडमध्ये चार शिक्षकांनी एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना आणि महिलांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न निर्माण झाला असताना नांदेडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. बिलोली तालुक्यातील चार शिक्षकांनी गुरु – शिष्य नात्याला काळीमा फासल्याचे समोर आले आहे. एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून पीडितेची प्रकृती गंभीर आहे. सध्या पीडिती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चार नराधमांविरुद्ध पॉक्सो कायदा, तसेच कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

नांदेड जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ५० किमीच्या अंतरावर असलेल्या साईबाबा विद्यालयात ही विद्यार्थीनी शिकत होती. दरम्यान, या शाळेच्या शिक्षकांनी त्या पीडितीवर सामूहिक बलात्कार केला. तसेच बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लील व्हिडिओ देखील दाखवण्यात आले होते. हा सर्व घडलेला प्रकार पीडितीने आपल्या कुटुंबियांना सांगितला. हा प्रकार कळताच कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकरली. याबाबत कुटुंबियांने शाळेत जाऊन जाब विचारताच संपूर्ण शाळेत एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पीडितेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

आरोपींवर गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विद्यार्थींनीच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये सय्यद रसुल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील, घनंजय शेळके अशी अत्याचार करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना साथ देणारी महिला कर्मचारी सुरेखा बनसोडे हिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हे चारही शिक्षक आणि महिला कर्मचारी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.


हेही वाचा – शिर्डी आणि परिसरातील २५ गावांत कडकडीत बंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -