घरताज्या घडामोडीनवी मुंबईत लिफ्ट कोसळून चार मजुरांचा मृत्यू

नवी मुंबईत लिफ्ट कोसळून चार मजुरांचा मृत्यू

Subscribe

निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट (Elevator) कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईच्या तळोजा येथील शिर्के कॉलनीतील निर्माणाधीन इमारतीत ही घटना घडली.

निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट (Elevator) कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईच्या तळोजा येथील शिर्के कॉलनीतील निर्माणाधीन इमारतीत ही घटना घडली. या दुर्घटनेत एक गंभीर जखमी (Injured) झाला आहे. जखमी मजुराला उपचारासाठी पनवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Four workers die in elevator collapse at Shirke Colony in Taloja Navi Mumbai)

तळोजा येथे नव्या इमारतीचे काम सुरू आहे. हे काम इमारतीच्या बांधकामाचे साहित्य घेऊन जाणारी लिफ्ट कोसळून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. शिर्के कंस्ट्रक्शनने दुर्घटनेची जबाबदारी स्विकारली असून मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ७ लाख तर गंभीर जखमींच्या कुटुंबियांना २ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कंत्राटदार बी. जी. शिर्के यांना सिडकोतर्फे देण्यात आले आहेत. याचबरोबर जखमींवरील उपचारांचा खर्च देखील कंत्राटदार बी. जी. शिर्के यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.

निर्माणाधीन इमारतीखाली उभ्या असलेल्या कारचाही चक्काचूर झाला आहे. या दुर्घटनेची सिडकोककडून चौकशी करण्यात येणार आहे. तळोजा फेज २ मध्ये सिडको गृहनिर्माण योजनेचे कंस्ट्रक्शन चालू आहे. या साईटवरील बांधकामाचे साहित्य ने-आण करणारी मालवाहतूक लिफ्ट कोसळल्याने अपघात झाला आहे.

- Advertisement -

या अपघातामध्ये शिर्के कंस्ट्रक्शन कंपनीचे ४ मजूर जागीच ठार झाले तर २ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही लिफ्ट इमारतीखाली उभ्या असलेल्या कारवर पडल्याने कारचाही भुगा झाला आहे. संपूर्ण घटनेची सिडकोतर्फे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.


हेही वाचा – फडणवीसांकडून राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -