घरताज्या घडामोडीमुंबईत करोनाचा चौथा रूग्ण आढळला!

मुंबईत करोनाचा चौथा रूग्ण आढळला!

Subscribe

मुंबईत आणखी एक करोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे.

मुंबईत आणखी एक करोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे मुंबईत करोनाग्रस्त रूग्णांची संख्या चार झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. दहा रूग्ण हे पुण्यातील आहेत. तर नागपुरात तीन रूग्णांना करोनाची लागण झाली आहे. मात्र, मुंबईत हा आकडा चारवर पोहोचला आहे. चाचणी अहवालातून रूग्णाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात करोनाचा फैलाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्य-सिनेमागृहे आज मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. खबदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा आहेत. त्यामुळे त्या बंद करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक अशी बंद करता येणार नाही. मात्र, नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये. कारण असले तरच प्रवास सुरू करावा, तसेच मॉलमध्येही जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -