घरताज्या घडामोडीपुण्याच्या बिल्डर परांजपे बंधूवर फसवणूकीचा गुन्हा, रात्री मुंबई पोलिसांकडून पुण्यात कारवाई

पुण्याच्या बिल्डर परांजपे बंधूवर फसवणूकीचा गुन्हा, रात्री मुंबई पोलिसांकडून पुण्यात कारवाई

Subscribe

खोटे दस्तावेज बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल

पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधूना मुंबई पोलिसांकडून फसवणूकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. वसुंधरा डोंगरे या ७० वर्षीय महिलेने बिल्डर श्रीकांत परांजपे (Shrikant Paranjape) आणि शशांक परांजपे ( Shashank Paranjape) यांच्या विरोधात फसवणूकीची तक्रार केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, फिर्यादी या परांजपे यांच्या संपत्तीतील हिस्सा न दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. याबाबत गुरुवारी दुपारी विलेपार्ले पोलीस ठाण्यात खोटे दस्तावेज बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केला. त्यानंतर परांजपे बंधूंना पुण्यातून अटक करण्यात आली. त्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. (Fraud case against Pune builder Shrikant Paranjape and Shashank Paranjape action taken by Mumbai Police in Pune last night)

महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी मध्यरात्री दोघांना त्याच्या पुण्याच्या राहत्या घरी जाऊन ताब्यात घेतले. तक्रारीनंतर दोन्ही बंधूना मध्यरात्री मुंबई पोलिसांनी पुण्यातून मुंबईतील विलेपार्ले येथे आणले. परांपजे बिल्डर यांच्या विरोधात विलेपार्ले पोलिसांकडून कलम ४७६,४६७,६८,४०६,४२०,१२०ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

वसुंधरा डोंगरे या वारस असताना त्यांच्या जमिनीची त्यांना न विचारता विक्री करण्यात आली. परांजपे बंधूंनी खोटे दस्तावेज तयार करून विश्वासघात केला असल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रितसर दोन्ही बिल्डर बधूंच्या विरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी रात्री साठे आठ वाजताच्या सुमारात परांजपे बंधूंना त्यांच्या पुण्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. मध्यरात्री त्यांना विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर विलेपार्ले पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

पुण्यातील बिल्डर्स विरोधात कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील अमित लुंकड बिल्डरला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ठेविदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बिल्डर अमित लुंकड याला अटक करण्यात आली असून सध्या तो येरवडा जेलमध्ये आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वाझेच्या पत्रातील आरोप खोटे, जनता दूधखुळी नाही, जयंत पाटील यांचा भाजपवर पलटवार

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -