हिंदुस्तान युनिलिव्हरची डीलरशिप देण्याच्या बहाण्याने ३१ लाखांना गंडा

Fraud Of 31 lakh pretendind dealership of Hindustan Unilever
Fraud Of 31 lakh pretendind dealership of Hindustan Unilever
लासलगाव : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांना राहुल शर्मा असे नाव भासवणाऱ्या इसमाने तब्बल ३१ लाख ७१ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक २४ जून २०२० पासून २१ ऑगस्ट २०२० या कालावधीमध्ये फिर्यादी निखिल राजेंद्र राऊत (रा. विंचूर) याने हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिपसाठी आॅनलाईन अर्ज भरल्याने त्यात वरिल नंबरवरून राहुल शर्मा नावाचे इसमाने कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून फिर्यादी निखिल राऊत याने वेळोवेळी युनियन बैंक आॅफ इंडिया शाखा अंधेरी ईस्ट मुंबई व पंजाब नैशनल बैंक शाखा अंधेरी ईस्ट मुंबई या बँकेच्या बनावट हिदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या नावाचे खातेवर वेगवेगळ्या प्रकारे रक्क्मा वेळोवेळी वेगवेगळी कारणे देवुन RTGS द्वारे एकुण रक्कम ३०,७१,५०० रुपये एवढ्या रक्कमेची ऑनलाईन फसवणूक केली. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपणीची खोटी वेबसाईट बनवून डिस्ट्रीब्युटरशिप देतो असे फसवून फिर्यादीस डिस्ट्रीब्युटरशिपचे कन्फर्मेशन लेटरचे खोटेप्रमाणपत्र देवुन फिर्यादीचा एकूण ३०,७१,५००/-रूपयेची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये  भादंवी 420,464,468,471,34 आयटी ऍक्ट 66 सी,66 डी अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.