Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पालिका आयुक्तांचीच बनावट स्वाक्षरी, वॉल्व्हमन पदासाठी २० लाखांचा सौदा

पालिका आयुक्तांचीच बनावट स्वाक्षरी, वॉल्व्हमन पदासाठी २० लाखांचा सौदा

तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा प्रकार

Related Story

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेत वॉल्व्हमन म्हणून नोकरी देण्यासाठी एका व्यक्तीकडून तब्बल २० लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत खुद्द महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी माहिती दिली.

सिनिअर जर्नालिस्ट फोरमच्या बैठकीत ते बोलत होते. शहरातील मोक्याच्या जागा बीओटी तत्वावर विकसित करण्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता, आयुक्तांनी आपला बीओटी तत्व्वाला नव्हे तर हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियाला आक्षेप आहे असे सांगत या प्रक्रियेला लेखी स्वरुपात स्घगिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थगिती देण्याचा निर्णय माझ्या हाती आहे, मात्र तंत्रज्ञानाचा वापर करुन कुणी काम पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असेल तर ते तातडीने मला समजणे अवघड होते. मात्र, कधी ना कधी असे प्रकार उघडकीस येतातच, असे सांगत त्यांनी अशाच एका प्रकाराची माहिती दिली.

- Advertisement -

आयुक्त कैलास जाधव म्हणाले की, तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करत एकाला वॉल्व्हमन म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे त्या नोकरीसाठी २० लाख रुपये घेतल्याचे संबंधिताने सांगितले. अलिकडेच हा प्रकार उघडकीस आल्याचीही त्यांनी सांगितले. डिजिटल तंत्रज्ञानाचाही फसवणुकीसाठी कसा उपयोग होतो, हे यावरुन लक्षात येते, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -