घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर'मनोज' नाव असलेल्या व्यक्तीला स्पेशल ऑफर; 'या' हॉटेलचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा

‘मनोज’ नाव असलेल्या व्यक्तीला स्पेशल ऑफर; ‘या’ हॉटेलचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा

Subscribe

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलकर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर मनोज जरांगे राज्यभरात दौरे करत आहेत. आज (१५ नोव्हेंबर) मनोज जरांगेंचा बीडमध्ये दौरा सुरू असून त्यांच्या पुष्पवृष्ठी होत आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी पुकारलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला अनेक स्तरावरून पाठींबा मिळतो आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलकर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर मनोज जरांगे राज्यभरात दौरे करत आहेत. आज (१५ नोव्हेंबर) मनोज जरांगेंचा बीडमध्ये दौरा सुरू असून त्यांच्या पुष्पवृष्ठी होत आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी पुकारलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला अनेक स्तरावरून पाठींबा मिळतो आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील एका हॉटेल चालकाने देखील मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी एक भन्नाट ऑफर सुरु केली आहे. या हॉटेलमध्ये मनोज नाव असलेल्या व्यक्तीला थेट मोफत जेवण देण्यात येत आहे. मात्र, यासाठी अट देखील ठेवण्यात आली आहे. (free food for manoj name person in the hotel at chhatrapati sambhaji nagar to support the maratha reservation protest)

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी देखील जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी एक भन्नाट ऑफर सुरु केली आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी येणाऱ्या मनोज नावाच्या व्यक्तीला मोफत जेवण देण्याची त्यांनी घोषणा केली आहे. पण यासाठी मनोज नावाच्या व्यक्तीने स्वतःचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे, अशी अट ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ओबीसी कोटा वाढवण्याची गरज, सरकारच्या भूमिकेवर विजय वडेट्टीवार नाराज

दरम्यान, या हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी आपल्या हॉटेलच्या बाहेर एक बोर्ड लावला असल्याचे समजते. या बोर्डवर बाळासाहेब भोजने यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत मनोज नावाच्या व्यक्तीसाठी नेमकी ऑफर काय आहे, ते लिहिले आहे. “मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभारून अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकत्रीत केले. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय किंवा इतर ताकदीचे पाठबळ नसतांनाही जर आपले ध्येय निश्चित असेल व समाजासाठी चांगले कार्यकरण्याची निर्मळ निस्वार्थ भावना मनात असेल तर एकटा माणूस काय करू शकतो हे मनोज जरांगे पाटीलासारख्या लढावय्या योध्याने दाखवुन दिले. त्यांच्या कार्याला मनापासुन सलाम. मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आमच्या मनात असलेला आदर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणुन ‘मनोज’ नावाच्या व्यक्तीला आमच्या हॉटेल अमृत प्युअर व्हेज पाचोडमध्ये मोफत जेवण देत आहोत”, असे बाळासाहेब भोजने यांनी लिहिले आहे.

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळताना पाहायल मिळत आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना ठिकठिकाणी पाठिंबा दिला जात आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना ठिकठिकाणी पाठिंबा दिला जात आहे.


हेही वाचा – मुंबई पोलिसांना अज्ञाताकडून धमकी, भारत-न्यूझीलंड सामन्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -