घरमहाराष्ट्ररेशन दुकानावर मिळणार मोफत साडी, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी सरकारची योजना

रेशन दुकानावर मिळणार मोफत साडी, अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी सरकारची योजना

Subscribe

मुंबई : चैत्र पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त स्वस्त धान्य अर्थात रेशन दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ देणाऱ्या राज्य सरकारने आता राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी लाभार्थीला दिली जाणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. राज्यातील 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येईल.

हेही वाचा – दिवाळी संध्येच्या माध्यमातून भाजपाची मतपेरणी, मुंबईत ठिकठिकाणी आयोजन

- Advertisement -

वस्त्रोद्योग विभागाने 2 जून 2023 रोजी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एका साडीचे मोफत वाटप करण्याची योजना आखली आहे. ही योजना 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पात्र कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक या प्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.

ही योजना राज्य यंत्रमाग महामंडळ राबविणार असून 2023-24 या वर्षासाठी महामंडळ एक साडी 355 रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात येईल.

- Advertisement -

‘आनंदाचा शिधा’ वितरणात दिरंगाई, ठाकरे गट आक्रमक

राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’ देण्याचे जाहीर केले आहे. मात्र दिवाळीला सुरुवात झाली तरी अद्यापही काही ठिकाणी सर्वसामान्यांना ‘आनंदाचा शिधा’ मिळालेला नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. याबाबतच्या असंख्य तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी स्वतःचे राजकीय मूल्यमापन काय हे समजून घ्यावे; दरेकरांचा हल्लाबोल

तर, या आनंदाचा शिधामध्ये घोटाळा झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मैद्याची अर्धा किलोची पाकिटे प्रत्यक्षात 470-460 ग्रॅम वजनाची आहेत. पाकिटातील 30 ते 40 ग्रॅम रवा, मैदा जातो कुठे? आणि असा किती रवा, मैदा हा नफेखोरीमध्ये जातो? सर्वसामान्यांचे सरकार, शासन आपल्या दारी म्हणत हे सरकार आनंदाचा शिधा देतो आहे. त्यामुळे आनंदाच्या शिध्याच्या माध्यमातून नफेखोरीचा फायदा नेमका कोणाला होतो? असे सवाल त्यांनी केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -