घरमहाराष्ट्रबुलढाण्यात भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल कुस्ती

बुलढाण्यात भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल कुस्ती

Subscribe

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे बुलढाण्यातील वातावरण तापलं आहे. गायवाड यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्याचवेळी निषेध करण्यासाठी उतरलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल कुस्ती झाली. यामध्ये शिवेसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे.

बुलढाणा मधील जयस्तंभ चौकात आज दुपारी ४ च्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या भाजप नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. भाजप पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला.

- Advertisement -

भाजपचे कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे. पुतळा जाळण्यासाठी आल्यामुळे धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात हातापाई झाली. तर शिवसेनेने शिंदे यांना खाली पाडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गटांना वेगळं करण्यात आलं.

काय आहे प्रकरण?

संजय गायकवाड बुलढाण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी लसींबाबत, औषधांबाबत महाराष्ट्रा सोबत होत असलेल्या दुजाभावाबद्दल जाहीरपणे संताप व्यक्त केला. मात्र, यावेळी त्यांचा तोल घसरला. मला करोनाचे विषाणू सापडले तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, इतका तिरस्कार ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे, असं गायकवाड म्हणाले. ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरातील कर्ता पुरुष जातो, त्याला समजतं की करोना काय आहे. त्यामुळं भाजपच्या लोकांनी राजकारण थांबवावं, असं आवाहन देखील संजय गायकवाड यांनी केलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -