घरठाणेफ्री वे आता थेट ठाणे घोडबंदरपर्यंत, एमएमआरडीए करणार विस्तार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

फ्री वे आता थेट ठाणे घोडबंदरपर्यंत, एमएमआरडीए करणार विस्तार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Subscribe

ठाणे : मुंबईकरांना वाहतूक कोंडीत दिलासा देणाऱ्या ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री-वेचा विस्तार आता घाटकोपरपासून ठाण्यापर्यंत थेट घोडबंदरच्या फाऊंटन हॉटेलसमोरील चौकापर्यंत होणार आहे. ठाणे शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून फ्री वे आता थेट घोडबंदरच्या टोकापर्यंत एलिवेटेड मार्गाद्वारे विस्तारित केला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत घोषणा केली आहे.

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पडणारा वाहतुकीचा प्रचंड ताण लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून फ्री वेचा पर्यायी समांतर आणि तुलनेने जलदगती मुक्तमार्ग उभारला होता. सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते घाटकोपरपर्यंत वाहनचालकांना फ्रीवेच्या माध्यमातून जलदगतीने प्रवास करता येतो. तथापि घाटकोपरच्या पुढे विक्रोळी-भांडुप-मुलुंड ते अगदी ठाण्याच्या एन्ट्री नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. यामध्ये बहुसंख्य वाहने ही ठाण्याच्याही पुढे राज्यभरात जाणारी असतात, मात्र त्याचा मोठा फटका ठाणेकरांना सहन करावा लागतो. ठाणेकरांची ही वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन एमएमआरडीएने घाटकोपरपासून पुढे ठाण्यापर्यंत आणि ठाण्यापासूनही पुढे घोडबंदर मार्गे फाऊंटन हॉटेलपर्यंत या ईस्टर्न एक्स्प्रेस फ्रीवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यातील लोकमान्य नगर येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी आयोजित केलेल्या जाहीर कार्यक्रमात ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याकरिता ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेचा विस्तार घाटकोपरपासून पुढे ठाणे घोडबंदर रोडपर्यंत करण्याची घोषणा केली. यामुळे ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीवर पडणारा शहराबाहेर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून ही सर्व अवजड वाहतूक आता ठाण्यात न येता थेट या विस्तारित एक्सप्रेस फ्री वेमुळे थेट ठाण्याच्या बाहेर जाऊ शकणार आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -