Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अजितदादा ते अशोक चव्हाण, आरोपांमुळे कोणत्या नेत्यांकडून मंत्रीपदाचा राजीनामा?

अजितदादा ते अशोक चव्हाण, आरोपांमुळे कोणत्या नेत्यांकडून मंत्रीपदाचा राजीनामा?

Related Story

- Advertisement -

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट देत होते, असा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका उच्च न्यायालयाकडे वर्ग केली. त्याचवेळी Adv. जयश्री पाटील यांनी देखील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला १५ दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

मंत्रीपदावार असताना राजीनामा देणारे अनिल देशमुख हे पहिलेच मंत्री नाही आहेत. याआधी देखील मंत्र्यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यामध्ये ए. आर. अंतुल यांच्यापासून ते नुकताच वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड. यामध्ये अजित पवार, अशोक देशमुख, छगन भुजबळ यांच्यासारखी मोठी नावं देखील आहेत.

ए. आर. अंतुले (काँग्रेस)

- Advertisement -

ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना ए. आर. अंतुले यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. यानंतर २० जानेवारी १९८२ रोजी ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

शिवाजीराव निलंगेकर (काँग्रेस)

शिवाजीराव निलंगेकर हे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर वैद्यकीय परीक्षेत आपल्या मुलीचे गुण वाढवल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर निलंगेकरांनी १३ मार्च १९८६ रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

भाई सावंत (काँग्रेस)

- Advertisement -

भाई सावंत हे जेव्हा राज्याचे आरोग्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्यावर नित्कृष्ट दर्जाची औषधं खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर भाई सावंत यांनी त्यांच्या आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

शोभाताई फडणवीस (भाजपा)

शोभाताई फडणवीस या जेव्हा युतीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होत्या, तेव्हा त्यांच्यावर १९९७ साली रेशन डाळ घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. त्यांतर त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

महादेव शिवणकर (भाजपा)

महादेव शिवणकर हे जेव्हा पाटबंधारे मंत्री होते, तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

बबनराव घोलप (शिवसेना)

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बबनराव घोलप सामाजिक न्यायमंत्री असताना चर्मकार महामंडळात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यांतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

सुरेश जैन – (राष्ट्रवादी काँग्रेस)

जळगाव बँक घोटाळा आणि जळगाव महापालिका घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

अशोक चव्हाण – (काँग्रेस)

अशोक चव्हाण ज्यावेळी आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

अजित पवार – (राष्ट्रवादी काँग्रेस)

अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अजित पवार जलसंपदा मंत्री असताना सिंचन घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले होते.

आर. आर. पाटील – (राष्ट्रवादी काँग्रेस)

मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्याने मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरु गेला होता. यावेळी राज्याचे तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी “बडे बडे शहरों में, ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है” असं विधान केलं होतं. यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

विलासराव देशमुख – (काँग्रेस)

मुंबईवरील २६/११ हल्ल्यामुळे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

छगन भुजबळ – (राष्ट्रवादी काँग्रेस)

छगन भूजबळ जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा ३३ हजार कोटींचा मुद्रांक घोटाळा चांगलाच गाजला. यामुळे छगन भुजबळ यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

नबाब मलिक – (राष्ट्रवादी काँग्रेस)

माहिम जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकरणात नबाव मलिक यांच्यावर आरोप झाले. आरोपानंतर १० मार्च २००५ रोजी त्यांनी गृहनिर्माण मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

संजय राठोड – (शिवसेना)

पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी संजय राठोड यांनी वनमंत्री पाचा राजीनामा दिला. संजय राठोड हे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोपी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यानंतर संजय राठोड यांनी राजीनामा दिला.

 

- Advertisement -