कोल्हापूर : व्हॉट्सअपला औरंगजेब आणि टिपू सुलतान स्टेटस ठेवल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनेने आज आंदोलन केले. शांततेने आंदोलन सुरू होते, मात्र शहरातील मटण मार्केट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. याप्रकरणी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अचानक औरंग्याच्या एवढ्या औलादी या महाराष्ट्रामध्ये कुठून पैदा झाल्या याचा शोध आपल्याला लावावा लागले. याशिवाय यांच्या पाठीमागे कोण आहे हे देखील पाहावे लागेल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जाणीवपूर्वीक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे, याकरता या औलादी पैदा झाल्या नाही ना याचा देखील शोध घ्यावा लागेल. कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती की, कोणीही कायदा आणि सुव्यवस्था याठिकाणी खराब होणरा नाही याची काळजी घ्यावी. कायदा कोणी हातात घेऊ नये, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. (From where were so many children of Aurangya born…; Fadnavis’ tough role in Kolhapur case)
आम्ही कुठल्याही परिस्थिती अशा प्रकारच्या औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही. याठिकाणी कोणीही औरंगजेबाचे उदात्तीकरण करू शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पण हे जे नव्याने पैदा झालेले आहेत, याचे बोलविते धनी कोण आहेत हेही शोधून काढावे लागेल आणि ते आम्ही शोधून काढू. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे त्याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होतो, त्यासोबत औद्योगिक राज्य म्हणून महाराषट्राचे जे नावलौकीक आहे याच्यावरही अशा घटनांमुळे एक डाग लागतो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे. कोणीही हातात कायदा घेऊ नये आणि कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई ही करावीच लागेल.
औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणी केले तर संताप निर्माण होतो
औरंगजेब हा विषय आंदोलनाचा आहे का अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते काय म्हणाले हे मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीही केलं तर याठिकाणी साहजिक संताप निर्माण होतो. फक्त अशा प्रकारच्या संतामामध्ये कायदा हातात देणं हे योग्य नाही आहे. त्याचं समर्थन मात्र केलं जाऊ शकत नाही.