घरमहाराष्ट्रइंधन दरवाढ कमी होणार नाही

इंधन दरवाढ कमी होणार नाही

Subscribe

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केली भूमिका

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करता येणार नाहीत. केंद्र सरकारला कल्याणकारी योजनांसाठी पैसे हवे आहेत. त्यामुळे सबसिडी देऊन इंधन दर कमी करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी येथे सांगितले.

सरकारचे उत्पन्न बरेच कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान उत्पन्न कमी राहिले आणि २०२१-२२ मध्येही कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे इंधन दर आता कमी करता येणार नाहीत असेही ते म्हणाले. आज मुंबईत सर्वात महाग पेट्रोल यामुळे आहे की महाराष्ट्राचा कर देशात सर्वात जास्त आहे. राजस्थानचा कर पेट्रोलवर सर्वात जास्त आहे. असं धर्मेंद्र प्रधान यांनी बोलून दाखवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -