कोरोना निर्बंधातून लहान मुलांची सुटका, १८ वर्षाखालील मुलांना पूर्ण लसीकरणाचा दर्जा

full immunization status for children below 18 years
कोरोना निर्बंधातून लहान मुलांची सुटका, १८ वर्षाखालील मुलांना पूर्ण लसीकरणाचा दर्जा

कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध नसताना नाईलाजाने सहन कराव्या लागणाऱ्या कोरोना विषयक निर्बंधातून १८ वर्षांखालील मुलांची सुटका झाली आहे. राज्य सरकारने १८ वर्षांखालील मुलांना पूर्ण लसीकरण झाल्याचा दर्जा दिल्याने मुलांचा निर्बंधांचा जाच दूर झाला आहे.

राज्य सरकारने पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या व्याख्येत सुधारणा केली आहे. या व्याख्येत १८ वर्षाखालील व्यक्ती तसेच वैद्यकीय कारणामुळे लस न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. भविष्यात जर १८ वर्षांखालील वयोगटासाठी लस उपलब्ध केली गेली तर लस उपलब्धतेच्या नंतरही ६० दिवसांसाठी ही सुधारणा अमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लॉकडाउन नंतर टप्प्याटप्प्याने विविध सेवा देणाऱ्या तसेच सेवा प्राप्त करणाऱ्यांसाठी कामाची परवानगी देण्यात आली असून त्यांचे पूर्णपणे लसीकरण झालेले बंधनकारक आहे. सद्यस्थितीत पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीच्या व्याख्येमध्ये ज्यांनी दोन्ही लशी ठराविक कालांतराने घेतलेल्या आणि दुसरी लस घेऊन चौदा दिवस लोटले आहेत, त्यांचा समावेश आहे.

मात्र, वैद्यकीय कारणामुळे किंवा ज्यांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आहेत,अशा व्यक्ती लस घेऊ शकत नाही. अशा नागरिकांसाठी लसीकरण झालेल्या लोकांच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार ज्या व्यक्तीला वैद्यकीय कारणांमुळे लस घेणे शक्य नसेल अशांना मान्यता प्राप्त डॉक्टराकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल.


१४ ऑक्टोबरनंतर खाद्य तेलाचे दर गडगडणार, मोदी सरकारचे मोठा निर्णय