Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र महिलांच्या हाफ तिकीटने एसटीचा गल्ला फुल्ल; एकाच दिवसात इतक्या कोटींची कमाई

महिलांच्या हाफ तिकीटने एसटीचा गल्ला फुल्ल; एकाच दिवसात इतक्या कोटींची कमाई

Subscribe

शासनाने घेतलेला एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट दिल्यानंतर एसटी आता मालामाल झाली आहे.

शासनाने घेतलेला एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट दिल्यानंतर एसटी आता मालामाल झाली आहे. शुक्रवारी १७ मार्च रोजी एसटी महामंडळाने महिलांसाठी अर्ध्या तिकीटाची योजना जाहीर केली आणि एसटी महिला प्रवाशांनी भरून निघाली. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही वाढ झालेली पहायला मिळाली.

२० वर्षांपूर्वी खासगी बस आणि टॅक्सीचा पर्याय नसल्यामुळे एसटी बसेसमध्ये पाय ठेवायला जागा नसायची. प्रत्येक बस प्रवाशांनी खच्चून भरलेली असायची. मात्र, खासगी बस आणि अन्य पर्याय प्रवासासाठी उपलब्ध झाल्याने एसटीचा खडखडाट बघता प्रवासी एसटीला दुरूनच टाटा करीत होते. त्यामुळे अनेक बसेस रिकाम्या ठणठण धावत असल्याचे चित्र होते. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटीत महिला प्रवाशांची संख्या वाढली आणि एसटीला पुन्हा सुगीचे दिवस येऊ लागले. शुक्रवारी एका दिवसात ११ लाखांहून अधिक महिलांनी एसटीने प्रवास केला आहे. पन्नास टक्के तिकिटानुसार एसटीला २ कोटी ८४ लाख रुपयांचा महसूल मिळाला असून उर्वरित पन्नास टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे.

- Advertisement -

सवलत जाहीर होण्याआधी एसटीने दररोज ५५ लाख प्रवासी प्रवास करत होते. त्या माध्यमातून महामंडळाला २३-२४ कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. एसटीने ‘महिला सन्मान योजना’ काढल्याने अनेकांना असे वाटते की महामंडळाला तोटा सहन करावा लागेल. परंतू तिकीटांची अर्धी रक्कम सरकार एसटीला प्रतिपूर्ती म्हणून अन्य 29 समाज घटकांच्या सवलती प्रमाणे याची परतफेड सरकार एसटीला करणार आहे. या योजनेमुळे एसटीला तोटा होण्याऐवजी उलट झालीच तर प्रवासी संख्येत भरच पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

मुंबई विभागाचेही उत्पन्न चौपटीने वाढले

डेपो–               प्रवासी आधी    –    एक दिवसानंतर  –   उत्पन्न आधी    –    एक दिवसांनंतर

मुंबई–                       233        –      1,153        –          23,798      –     1,19206

परळ –                      221        –       945          –          11,329      –       62,857

कुर्ला –                       256        –      1,388        –          4,354       –       55,578

पनवेल–                   2,634       –       4,695       –         48,459      –        88,637

उरण –                     1,209       –       4,701       –        17,046      –       81,374

मुंबई डीव्हीजन–       4,553        –      1,2882       –      1,04,986   –    4,07,652

- Advertisement -

 

 

- Advertisment -