घरताज्या घडामोडीहिंगणा MIDCतील फर्निचर कंपनीला भीषण आग

हिंगणा MIDCतील फर्निचर कंपनीला भीषण आग

Subscribe

. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीतील फर्निचर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता नागपूरमध्ये देखील एका कंपनीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीतील फर्निचर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या कंपनीत लाकडू अधिक प्रमाणात असल्यामुळे ही आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप आग विझलेली नाही. त्याचप्रमाणे आगीचे कारण देखील स्पष्ट झालेले नाही.

हिंगणा एमआयडीतील औद्योगिक वसाहतीतील फर्निचर बनवणाऱ्या कंपनीला अचानक भीषण आग लागली. या ठिकाणी लाकडाचा मोठा साठा असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच परिसरात आगीचे लोट पसरले आहेत. मात्र, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचप्रमाणे या आगीत कोणाला दुखापत झाल्याचे देखील कळू शकलेले नाही. सध्या आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘दाल में कुछ कला नहीं, पूरी दालही काली है; ED वरुन विरोधकांचे ट्विटर वॉर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -