घरमहाराष्ट्रडीसीसी बँकेचे भवितव्य धोक्यात

डीसीसी बँकेचे भवितव्य धोक्यात

Subscribe

सात कोटी तोटा वाढला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसी) पूर्वपदावर येईल, असे वाटत होते. मात्र साखर कारखाने आणि बड्या उद्योजक यांच्या सुमारे ८७१ कोटी रुपयांच्या थकबाकी कर्जापोटी बँकेला टाळे लावण्याची वेळ आली आहे. बँकेच्या निव्वळ तोट्यात सात कोटी रुपयांची भर पडली आहे. कर्ज वसुलीबाबत बँक प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी बँकेसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

साखर कारखान्यांनी बँकेला बुडवले
बँकेला ३ कोटी ६८ लाख ८७ हजाराचा ढोबळ नफा झाला. परंतु विजय शुगर पंढरपूर, आर्यन शुगर बार्शी, सांगोला सएतकरी साखर कारखाना आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना यांच्या थकीत कर्जाचा समतोल साधण्यासाठी बँकेचा नफा व स्वानिधीतून सुमारे १६० कोटींची तरतूद केली. त्यामुळ बँकेला ६८ कोटी ९१ लाखांचा निव्वळ तोटा होता.

- Advertisement -

१११ शाखांना टाळे
शेतकरी कर्ज माफीतून बँकेला ३५० कोटी मिळाले, मात्र थकित कर्जाच्या भल्यामोठ्या आकड्यामुळे तोटा भरुन निघाला नाही.मार्च २०१८ अखेर ३९.३७ टक्के इतका एनपीए दिसून आला. यावरुन जवळपास ८७१ कोटी ९४ लाख १२ हजार इतकी थकबाकी असल्याचे स्पष्ट होते.बँकेच्या एकूण २१३ शाखेपैकी १११ शाखा तोट्यात चालत आहेत. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे तोट्यात चालणाऱ्या सर्व शाखा बंद कराव्या लागणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -