घरमहाराष्ट्रGadchiroli Encounter : पोलिसांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक करणार- एकनाथ शिंदे

Gadchiroli Encounter : पोलिसांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक करणार- एकनाथ शिंदे

Subscribe

महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेलगतच्या कोटगुल ग्यारापती जंगल परिसरात सी ६० पोलिसांशी झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. जवळपास दहा ते बारा तास सुरु असलेल्या या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेही ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. २६ जणांच्या मृतदेहांपैकी एक मिलिंद तेलतुंबडे याचा मृतदेह आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळीचा बिमोड करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांना मोठं यश प्राप्त झाल्याचे म्हणावे लागेल. याच पार्श्वभूमीवर आज गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्य़ाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांचे कौतुक केले आहेत. तसेच या पूर्ण कारवाईची माहिती दिली आहे.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “गडचिरोलीत झालेल्या चकमकीमध्ये २६ जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले . गडचिरोली पोलीस आणि सी ६० पोलीसांची टीम आणि इतर पोलीस जवानांनी मिळून २६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले. नक्षलवाद्याविरोधातील गेल्या वर्षाभरातील राज्यातील नाही तर देशभरातील मोठी कारवाई आहे. त्यामुळे गडचिरोली पोलिसांचे सर्व सत्रातून अभिनंदन होतय. त्यांना धन्य़वाद दिले जातायत. गडचिरोलीचा पालक मंत्री म्हणून मी देखील त्यांचे अभिनंदन केले. ही कारवाई गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल आणि अॅडिशनल एसपी समीर शेख आणि ऑपरेशन कंमांडो सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एवढी मोठी कारवाई काल झाली. यामध्ये चार पोलीस जवान जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पीटलमध्ये हॅलिकॉप्टरच्या मदतीने दाखल करण्यात आले. डॉक्टरांशी आणि दोन पोलीस जवानांशी फोनवरून चर्चा केली. त्यांच्या उपचारांच्या सुचना शासनाच्या माध्यमातून दिल्या आहेत. त्यांना काही कमी पडणार नाही डॉक्टरांना उत्तम उपचार देण्याच्या सुचना दिल्या आहेत. जवान जखमी होऊनही जवळपास दहा तास ही चकमक सुरु होती. ”

- Advertisement -

“पोलीस जवान, सीआरपीएफ, सी ६० जवान, सीआरपीएफ हे सर्व जवान गडचिरोलीमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. काल ही टीम गस्त घालत असताना नक्षलांनी समोरून गोळीबार केला. यावेळी पोलीसांनी देखील जीवाची बाजी लावून नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले, यामध्ये २६ नक्षलवादी मारले गेले, त्यांच्यावर अनेक बक्षीसे होते या नक्षलांनी नागरिकांवर पोलिसांवर मोठ्याप्रमाणात हल्ले केले होते. मारले होते. ही एक विशेष कारवाई झालेली आहे. त्याची दखल राज्यानेच नाही तर इतर नक्षलग्रस्त राज्ये आहेत त्यांनी घेतली आहे. यात जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे यांना कंठस्थान घातले आहे. तो नक्षलांचा सर्वांत मोठा कमांडर होता. छत्तीसगड, गडचिरोलीसह तीन राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याला तीन लेअरचे सुरक्षा कवचा होते. असे असतानाही गडचिरोली पोलिसांनी वेध घेत मिलिंद तेलतुंबडेसह अनेक नक्षलवाद्यांना ठार केले. तेलतुंबडेवर राज्यात ५० लाखांचे बक्षीस होते इतर राज्यातही त्यावर बक्षीसे होती. पालकमंत्री म्हणून मी बक्षीसाची रक्कम पोलिसांनी देण्याबाबत चर्चा करेन. मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याने राज्यासाठी नाही तर इतर राज्यांच्या नक्षलग्रस्त राज्य़ांसाठी धक्का आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस, सी ६० टीम आणि एसपी अॅडिशनल एसपी यांचे अभिनंदन करु तेवढं थोडं आहे.” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -