कर्जत-जामखेड : राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत कंबरेत लाथ घालण्याची भाषा करणाऱ्याला आमदार संजय गायकवाड यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंबी दिली का ? आमदाराला पक्षातून काढले का? असे सवाल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीत यांनी केले आहेत. छगन भुजबळ विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा किस्सा सांगितला.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले, “मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेत्याच्या कंबरेत लाथ घालून हाकलून द्या, असे म्हणणाऱ्या आमदाराला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का? त्या आमदाराला पक्षातून काढले का? महाराष्ट्रात काय सुरू आहे. या बेशिस्त आमदारांना ‘कष्टा’ने गोळा केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाले आहेत की, त्यांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ येऊ लागले आहे. त्या आमदारांना सांभाळाचे कसे हा प्रश्न आहे? आणि ते काय म्हणतील त्याला मान्यता देणे, याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे राहिलेला नाही”, अशी टीका जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे.
हेही वाचा – Maharashtra Politics : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
जयंत पाटलांनी सांगितला विलासराव देशमुखांचा ‘तो’ किस्सा
कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवरून जयंत पाटील यांना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक किस्सा कर्जत-जामखेडच्या सभेत सांगितला. जयंत पाटील म्हणाले, “2002-03 साली शरद पवार हे कोल्हापुरात आले होते. त्यावेळी मी भाषण करताना म्हटले होते की, शरद पवारसाहेब यांनी महाराष्ट्रात यावे आणि पुन्हा राज्याची जबाबदारी घ्यावी, असे वक्तव्य केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि शरद पवारसाहेब पुण्याला येत होते. तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मला फोन आला, असे मी शरद पवारसाहेबांनी सांगितले. तेव्हा शरद पवारसाहेब मला म्हटले की, तू काल राज्याची जबाबदारीबाबत म्हटले होते ना. त्यामुळे विलासराव देशमुखांचा फोन आला असेल, असे शरद पवार म्हणाले. यानंतर विलासराव देशमुख यांचा फोन घेतल्यावर ते म्हणाले, मंत्रिमंडळात तुम्ही राहा किंवा मी राहतो. मी फक्त एक वक्तव्य केले होते.”