घर महाराष्ट्र गजानन कीर्तिकरांना नेमकी भीती कोणाची? सापत्न वागणुकीच्या वक्तव्यावरून 'यू-टर्न'

गजानन कीर्तिकरांना नेमकी भीती कोणाची? सापत्न वागणुकीच्या वक्तव्यावरून ‘यू-टर्न’

Subscribe

शिवसेनेचे (शिंदे गट) मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. पण त्यांच्या या वक्तव्यावरून आता 'यू-टर्न' घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

26 मे या दिवशी प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे (शिंदे गट) मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. पण त्यांच्या या वक्तव्यावरून आता ‘यू-टर्न’ घेतल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळकते असे मी बोललोच नाही. तो शब्द माझ्या तोंडी घातला गेला, असे आता त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण अगदी चार दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर कीर्तिकरांनी अचानक घुमजाव का केला? कीर्तिकरांना नेमकी कोणाची भिती आहे? यांसारखे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत.

हेही वाचा – राष्ट्रवादी कॉंग्रेस लागली कामाला; लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केले सर्वेक्षण, ‘हे’ आले समोर…

- Advertisement -

“मी जेव्हा खासदार होतो अडीच वर्षे तेव्हा त्या अडीच वर्षात भाजपा आणि शिवसेनेची युती संपली आणि महाविकास आघाडी सुरु झाली. तेव्हा त्या अडीच वर्षांच्या कालावधीत आम्ही एनडीएचे घटक पक्ष नव्हतो. एकनाथ शिंदेंनी उठाव केला, त्यानंतर आमची आणि भाजपाची युती झाली आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आम्ही खासदार म्हणून भाजपासह गेलो. त्यामुळे आम्ही आता एनडीएचे घटक आहोत हे केंद्रीय मंत्र्यांना कळलं की नाही? की आम्हाला ते अजून पूर्वीप्रमाणेच समजतात? इतकंच मला म्हणायचं होतं,” असे म्हणत गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले होते गजानन किर्तीकर?

आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी असा घुमजाव नेमका का केला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये नक्कीच आलबेलं नसल्याचे सांगण्यात येत होते. पण असे काहीही नसल्याचे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होते. पण आता स्वतः केलेले वक्तव्य मी केलेले नाही, असे कीर्तिकर यांनी सांगितल्याने कीर्तिकरांवर नेमका कोणाचा दबाव आहे का? असे विचारण्यात येत आहे.

याच वक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कीर्तिकरांवर निशाणा साधला आहे. संपूर्ण मिंधे गटाला सापत्न वागणूक मिळते. स्टेटमेंट मी ऐकलेले आहे. त्यांनी ते स्वत: पून्हा एकदा ऐकावे आणि जाहीरपणे ऐकावे. ते असे बोलले आहेत की, आम्हाला सापत्न सावत्रपणाची वागणूक मिळते. आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. एनडीएमध्ये आम्हाला मान सन्मान मिळत नाही. आम्हाला घटक पक्षाचा दर्जा नाही. हे गजानन किर्तीकरांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. ते आमच्याकडे ज्येष्ठ नक्कीच होते, तिकडे आहेत की नाही माहिती नाही. तरी किर्तीकरांच्या बोलण्यामुळे आम्हाला वाटल की, इतका मोठा नेता आमच्याकडे होतो त्यांची तिथे काय अवस्था आहे. पण आता त्यांनी घुमजाव केला असं तुम्ही म्हणताय. यासाठी दबाव असू शकतो. पण त्याचं स्टेटमेंट त्यांनी पुन्हा ऐकावे किंवा आपण सर्वांना ऐकवावे ते काय बोलले आहेत, असे मत राऊत यांनी व्यक्त करत टीका केली आहे.

- Advertisment -