Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कुख्यात गुंड गजाला जंगी मिरवणूक भोवली, पोलिसांनी पुन्हा ठोकल्या बेड्या

कुख्यात गुंड गजाला जंगी मिरवणूक भोवली, पोलिसांनी पुन्हा ठोकल्या बेड्या

मारनेसह ९ साथीदार अटक तर २०० जणांवर कारवाई

Related Story

- Advertisement -

हत्येच्या गुन्हातून नुकताच बाहेर आलेला कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मागील ६ वर्षांपासून गजा मारणे तळोजा तुरुंगात होता. खूनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु आपल्या कृत्यामुळे कुख्यात गुंड गजा मारणे आणि ८ साथीदारांना पुणे पोलिसांनी पुन्हा तुरुंगवारी दाखवली आहे. गजा मारने आणि मारने टोळीने केलेल्या शक्तीप्रदर्शनाची शिक्षा आता भोगावी लागणार आहे. सोमवारी गजानन मारनेला खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले. तळोजा तुरुंगाच्या बाहेर गजा मारनेचे सहकारी ५०० हून अधिक गाडांचा ताफा घेऊन उपस्थित होते. गजा मारनेला तुरुंगातून घरी नेताना या सहकाऱ्यांनी जंगी मिरवणूक काढली आणि शक्तिप्रदर्शन केले हेच शक्तिप्रदर्शन आता गजा मारनेला भोवले आहे.

मारने टोळीने केलेल्या शक्तीप्रदर्शनवर पुणे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मारने टोळीतील २०० जणांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गजा मारने आणि ९ साथीदारांना अटक करण्यात आली आहे. गजानान मारणेला २०१४च्या खुनाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात ठोस पुरावा हाती नसल्यामुळे १५ फेब्रुवारीला गजानन मारनेची निर्दोष सुटका करण्यात आली होती. परंतु गजानन मारनेच्या साथीदारांनी ४००-५०० गाड्यांची जंगी मिरवणूक काढत गजा मारणेचे स्वागत केले.

- Advertisement -

पुणे टोलनाक्यावर या गाड्यांनी टोलही भरला नाही. तसेच मोठ्या संख्येने गाड्या आणल्यामुळे वाहनांची प्रचंड तुंबळ झाली होती. जंगी मिरवणूकीच्या व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसारितही केल्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी मारने टोळीवर मोठी कारवाई केली आहे. गजा मारने पुण्यात पोहचल्यावर रात्री त्याची पुन्हा मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी साथीदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच स्वागतासाठी अनेक फटाके फोडले. मारने टोळीने पुन्हा दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचाही ठपका या टोळीवर ठेवण्यात आला आहे.

गजा मारनेला निर्दोष मुक्त केल्यावर तळोजा कारागृहाच्या बाहेर साथीदारांची मोठी गर्दी झाली होती. याच कारागृहाच्या प्रवेशद्वारावर गजा मारनेचे जंगी स्वागतही करण्यात आले. यावर कारागृहाच्या दक्षिण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गजा मारनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -