घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना, गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना, गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा

Subscribe

राज्यात आजपासून सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घराघरात गणपती बाप्पाचं भक्तीभावाने आगमन होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आगमन आता घराघरात होत आहे. त्याच्या कृपेने दोन वर्षापासून कायम असलेलं कोरोनाचं संकट अखेर दूर झालं आहे. त्यामुळे आपण गणरायाचं अगदी उत्साहात आणि निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव करत आहोत. गणरायाचं हे आगमन आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी श्रीचरणी करतो, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करत राज्यातील तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज श्री गणेश चतुर्थी. सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ”, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


हेही वाचा : ठाकरेंकडून पक्षबांधणी! किशोरी पेडणेकरांचं उपनेतेपदी प्रमोशन, अमोल कीर्तिकरांनाही संधी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -