Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ganesh chaturthi 2021 पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूकांवर कोरोनाचे विघ्न; पाच मानाच्या गणपतींचे असे...

ganesh chaturthi 2021 पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूकांवर कोरोनाचे विघ्न; पाच मानाच्या गणपतींचे असे घ्या ऑनलाईन दर्शन

Related Story

- Advertisement -

पुण्यासह राज्यभरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची धूम पाहायला मिळतेय. पण यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न कायम आहे. त्यामुळे पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातही सर्वच मानाचे गणपती साधेपपणाने आणले जाणार आहे. या मानाच्या पाच गणपतींचे तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना आज दुपारपर्यंत होणार आहे. मात्रा कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका निघणार नाहीत. तसेच या गणपतींचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता येईल.

पाहूयात पुण्यातील पाच मानच्या गणपतींचे ऑनलाईन दर्शन कसे घेता येईल

कसबा गणपती मानाचा पहिला बाप्पा

पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी होणार आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात येईल. या सोहळ्याचे क्षण भक्तांना मंडळाच्या फेसबुक पेजवर दर्शन आणि लाईव्ह कार्यक्रम पाहता येईल.

तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती

- Advertisement -

पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी साडे अकरा वाजता वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते आणि सनई-चौघडा च्या सुरावटीत होणार आहे. फेसबुक फेजवरून भक्तांना दर्शन घेता येणार आहे.

गुरुजी तालीम मानाचा तिसरा बाप्पा

गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता केली जाणार आहे. यंदा सामाजिक उपक्रमांवर अधिक भर दिला जाणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.उत्सव मूर्तीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने मंडळाच्या फेसबुक पेजवर याचेही दर्शन होणार आहे.

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती

- Advertisement -

तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. गणेश याग मंत्रजागर असे धार्मिक विधी होणार आहेत. गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि दर्शन मंडळाच्या यूट्यूब पेजवर ऑनलाइन पाहता येईल.

केसरीवाडा मानाचा पाचवा बाप्पा

केसरीवाडा हा पुण्यातील मानाचा पाचवा बाप्पा आहे. केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने परंपरेनुसार पालखीतून केसरीवाड्यात मूर्ती आणली जाईल. केसरी चे विश्वस्त डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात सर्व धार्मिक विधी होतील. या चॅनलवर तुम्ही http//:youtube.com ऑनलाईन दर्शन घेऊ शकता.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी १० वाजून २३ मिनिटांच्या मुहूर्तावर अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. www.dagdushethganpati.com यावर तुम्ही ऑनलाईन दर्शन घेऊ शकता.


 

- Advertisement -