घरमहाराष्ट्रGanesh Chaturthi 2021: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताय? नवी नियमावली जाहीर

Ganesh Chaturthi 2021: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताय? नवी नियमावली जाहीर

Subscribe

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही कोकणातील गणेशोत्सव सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही नियम लादण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्गासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

गणेशोत्सवासाठी नवी नियमावली

१) कोरोनाविरोधी लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सर्टिफिकेट दाखवून सिंधुदुर्गात प्रवेश करण्याची मुभा असेल.

- Advertisement -

२) १८ वयोगटातच्या आतील बालके, तरुण यांच्या लसीकरणाला अद्याप सुरुवात न झाल्याने त्यांनाही प्रवेशाची मुभा असेल.

३) ७२ तास अगोदर केलेली आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या नागरिकांना प्रवेशाची मुभा, टेस्ट न केलेल्या नागरिकांची टेस्ट करत त्यांना गणेशोत्सवासाठी मोकळं केलं जाईल.

- Advertisement -

४) आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल.

५) दोन डोस झालेले नसल्यास RTPCR रिपोर्ट बंधनकारक

६) रेल्वे स्थानकावर  गर्दी होऊ नये यासाठी तीन रंगा असणार एक दोन डोस घेतलेले नागरिक, दुसरी १८ वर्षाखालील, आणि तिसरे टेस्ट न केलेल्या नागरिकांसाठी.

७) जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर मास्क घालणे सक्तीचे

८) जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सामाजिक अंतर राखणे आवश्यक

९) एकाच ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करण्यास मनाई


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -