Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात जमावबंदी, बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात

पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात जमावबंदी, बंदोबस्तासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात

पुणे शहरात १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान जमावबंदी लागू

Related Story

- Advertisement -

पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात गर्दी जमू नये यासाठी कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी या संदर्भातले आदेश जारी केले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ७ हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातल्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यासाठी ७ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावं, असं आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केलं आहे.

- Advertisement -

पोलिसांनी पुण्यात गणेशोत्सवासाठी यापूर्वीच आचारसंहिता जाहीर केली होती. त्यानुसार यंदा बाप्पांच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, ७०० अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल.

मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना साधेपणाने

पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी (१० सप्टेंबर) दुपापर्यंत होणार आहे. प्रतिष्ठापनेच्याआधी मिरवणूक निघणार नसली, तरी या गणरायाचं दर्शन ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या फेसबुक पेजवर, तर तुळशीबाग मंडळाच्या यूटय़ूब पेजवर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि ‘श्रीं’च्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -