घरगणेशोत्सव 2022देश आणि महाराष्ट्रासमोरचे सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावे; फडणवीसांचे गणरायाला साकडं

देश आणि महाराष्ट्रासमोरचे सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावे; फडणवीसांचे गणरायाला साकडं

Subscribe

गणेश चतुर्थीनिमित्त आज घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर गणपतीची स्थापना केली.

गणेश चतुर्थीनिमित्त आज घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर गणपतीची स्थापना केली. गणरायची स्थापना केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पाला साकडं घातलं असून, “देशासमोरचे आणि महाराष्ट्रासमोरचे सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावे”, अशी प्रार्थना केली आहे. (ganesh chaturthi 2022 ganapati bappa seated at the residence of deputy chief minister devendra fadnavis)

“सर्व गणेशभक्तांना माझ्याकडून शुभेच्छा. विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो की, आपल्या देशासमोरचे आणि महाराष्ट्रासमोरचे सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावे आणि सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य मिळावं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचे देश आणि राज्य प्रगतीपथाव जावे. हीच माजी श्रींच्या चरणी प्रार्थना आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

- Advertisement -

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाप्पाला साकडं घातल्याचे सांगितले. तसेच, “अतिशय आनंद वाटतोय की, पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषता मुंबई ज्याप्रकारे सजली आहे, जे उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याचा मला आनंद आहे. पुन्हा एकदा आपण आपले सर्व सण, उत्सव साजरे करू लागलो आहोत”, असेही फडणवीस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे हे पहिलेच गणेशोत्सव आहे. संपूर्ण परिवाराच्या उपस्थितीत गणरायाची पूजा आणि आरती करण्यात आली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुटुंबियांसोबत गणेशाची प्रतिष्ठापना केली. देशासमोरचे आणि राज्यासमोरचे विघ्न दूर होऊ दे असे साकडे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गणरायाला घातले.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील विदर्भासाठी मनसेचा मास्टर प्लॅन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -