माझ्यावर लावण्यात आलेले आरोप एक प्रकारचं षडयंत्र, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया

Ganesh Naik first reaction on allegations said allegations against me are a kind of conspiracy
माझ्यावर लावण्यात आलेले आरोप एक प्रकारचं षडयंत्र, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया

भाजप आमदार गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. आरोप फेटाळून लावले असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि आरोप हे षडयंत्र आहे. राजकारणामध्ये योग्य स्थान मिळाले नाही त्यामुळे माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं असा दावा गणेश नाईक यांनी केला आहे. एका महिलेकडून गणेश नाईक यांच्यावर अत्याचार आणि मानसिक त्रास दिला असल्याचा आरोप केला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाजप आमदार गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. दीपा चव्हाण नावाच्या महिलेनं गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेनं केलेल्या आरोपांनुसार गेली 27 वर्षे नाईक त्यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. या संबंधातून त्यांना एक मुलगासुद्धा आहे. असा आरोप महिलेने केला होता. महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु न्यायालयाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.

गणेश नाईक यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत येत्या काळात सविस्तर बोलणार आहे. राजकारणामध्ये योग्य ते स्थान न मिळाल्यानं काहींना माझ्याविरोधात षडयंत्र रचले आहे. असा आरोप विरोधकांवर गणेश नाईक यांनी केला आहे. तसेच सर्व आरोपसुद्धा गणेश नाईक यांनी फेटाळले आहेत.

गणेश नाईकांवर आरोप कोणते?

दीपा चौहान नावाच्या तरुणीने गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या २७ वर्षांपासून गणेश नाईक माझ्या संपर्कात होते. मी माझ्या न्याय हक्कासाठी मी लढाई लढत आहे. नाईकांसोबत असलेल्या संबंधातून आम्हाला एक मुलगा आहे. मुलगा पाच वर्षांचा झाल्यावर त्याला वडील म्हणून नाव देईल असे आश्वासन गणेश नाईक यांनी दिले होते. त्यांनी कोणतीही आर्थिक मदत केली नाही. गणेश नाईक यांनी अनेकदा माझ्यावर जबरदस्ती केली आहे. लैंगिक शोषण झाला असल्याचा आरोप पीडित महिलेने केले आहे. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली असून मुलासह मला अनेकदा धमकी देऊन घरातून बाहेर काढण्यात आले आहे. शारीरिक आणि मानसिक छळ गणेश नाईक यांनी केला असल्याची तक्रार महिलेने केली आहे.


हेही वाचा : राणा दाम्पत्याने घेतला मुंबईचा धसका, थेट दिल्लीत हनुमान चालीसा पठण