घरताज्या घडामोडीGanesh Visarjan 2021: पुण्यातील तुळशीबाग गणपती मिरवणुकीवर पोलिसांची कारवाई; ढोल-ताशे केले जप्त

Ganesh Visarjan 2021: पुण्यातील तुळशीबाग गणपती मिरवणुकीवर पोलिसांची कारवाई; ढोल-ताशे केले जप्त

Subscribe

अनंत चतुर्दशीला बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात निरोप दिला जातो. मात्र कोरोनाचे सावट असल्यामुळे बाप्पाला आता राज्य सरकारच्या निर्बंधानुसार निरोप द्यावा लागत आहे. यंदा गर्दी टाळण्यासाठी गणपतीच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. अशाच प्रकारे सर्व गणेश मंडळं शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाला निरोप देत आहेत. मात्र पुण्यातील तुळशीबाग गणपती मिरवणुकीत पोलीस पोहोचले आहेत. मिरवणुकीतील गर्दी पाहात पोलिसांनी कारवाई केली असून ढोल-ताशे जप्त केल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडा वाद देखील निर्माण झाला होता.

याबाबत तुळीबाग गणेश मंडळतील एका कार्यकर्त्याने सांगितले की, ‘मिरवणुकीच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मिरवणुकीची रुपरेषा ठरवण्यात आली होती. आम्ही स्पष्ट केलं होतं की, वादना शिवाय मिरवणूक होऊ शकत नाही. पोलिसांनी आमच्यावर निर्बंध घातले होते. त्या निर्बंधांचे पालन करून तीन ढोल, दोन ताशांची परवानगी आम्ही घेतली होती. आता कारवाई करण्याचे कारण काहीच नव्हते. पोलिसांना आम्ही सहकार्य करतो. पण ज्यांनी कारवाई केली आणि जे बैठकीमध्ये पोलीस उपस्थितीत होते, ते वेगवेगळे होते. त्यामुळे हे घडले.’

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, ‘आम्ही ५० कार्यकर्त्यांनी यादी पोलिसांकडे दिली आहे. तुळशीबागेतील सर्व प्रवेश आम्ही बंद ठेवले आहेत. कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सर्व नियमांचे पालन करून मिरवणूक काढली जात आहे. आता यापुढे बाप्पाचा जयघोषात विसर्जन कुंडापर्यंत घेऊन जाणार आहोत. पण जे स्थानिक नागरिक बाप्पाच्या मिरवणुकीसाठी आले आहेत, त्यांना आम्ही रोखू शकत नाही.’


हेही वाचा – Ganesh Visarjan Live Update: लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पाहा लाईव्ह

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -