Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कोकणात रेल्वे ब्रीजवरुनच उड्या, चाकरमान्यांची कोरोना टेस्टपासून पळवाट काढण्यासाठी नामी शक्कल

कोकणात रेल्वे ब्रीजवरुनच उड्या, चाकरमान्यांची कोरोना टेस्टपासून पळवाट काढण्यासाठी नामी शक्कल

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी कोरोना टेस्टपासून पळवाट काढण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. प्रशासन रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कोरोना टेस्ट करत असल्यामुळे चाकरमानी रेल्वे ब्रीजवरुन उड्या मारुन गावांमध्ये जात आहेत. यामुळे प्रशासन हतबल झालं आहे.

अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव आल्याने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार लसींचे दोन डोस न झालेले किंवा ७२ तासांतील कोरोना टेस्ट प्रमाणपत्र नसेल तर आरटीपीसीआर तिथेच केली जात आहे. कोकणात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसंच, कोरोना लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, त्यांना प्रमाणपत्र दाखवल्यानंतर प्रवेश मिळत आहे.

- Advertisement -

मात्र, कणकवली स्थानकात परिस्थिती खूपच वेगळी पहायला मिळत आहे. कारण रात्रभर प्रवास करुन वैतागलेले चकरमानी कणकवलीला येऊन ताटकळत थांबण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते. तपासणी न करताच काहीजण घरी जाताना दिसत होते.

आरोग्य प्रशासन हतबल

गणेशोत्सवाला चार दिवस उरल्याने चाकरमान्यांची कणकवली रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात चाकरमानी उतरत आहेत. त्यात पोलीस, आरोग्य, महसूल प्रशासन विभागाच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे गोंधळ उडाला आहे. तर कणकवली रेल्वे स्थानकात तपासणीचा ससेमिरा चुकवण्यासाठी प्रवाशांनी पळवाटा शोधत घरी जाणे पसंत केले. त्यामुळे पोलीस आणि आरोग्य प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

 

- Advertisement -