घर महाराष्ट्र चाकरमान्यांचे हाल! कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या 5-6 तास उशिरानं

चाकरमान्यांचे हाल! कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या 5-6 तास उशिरानं

Subscribe

गणेशोत्सवासाठी कोकणवासी कोकणात जात असतात. मात्र, यंदा कोकणवासीयांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सव स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या या 5 ते 6 तास उशिरानं धावत आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणवासी कोकणात जात असतात. मात्र, यंदा कोकणवासीयांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सव स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या या 5 ते 6 तास उशिरानं धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे. (Ganeshotsav 2023 The plight of Konkan Wasi Trains on Konkan Railway route are late by 5 to 6 hours)

कोकणकन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, कुडाळ गणपती स्पेशल, दिवा-रत्नागिरी, या गाड्या उशिरानं धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या उशिरानं धावत असल्यामुळे कोकणवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 12 तासांच्या प्रवासासाठी कोकणाची वाट धरलेल्या चाकरमान्यांना तब्बल 18 तास लागत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेने गावी जाण्यासाठी मुंबई, ठाण्यातील चाकरमानी प्रवाशांची अक्षरश: झुंबड उडाल्याचं चित्र पहायला मिळालं. या गर्दीमुळे काही प्रवाशांची ट्रेनही चुकली. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.

… म्हणून कोकणातील रेल्वेगाड्या उशिरानं धावतायंत

रेल्वेगाड्यांच्या उशिरानं धावण्यामागे कोकण रेल्वेच्या नियोजनाचा अभाव हे कारण आहे. मागणी करूनही सर्व सुपरफास्ट एक्स्प्रेस मिरज मार्गे न वळवल्यानं आणि मालगाड्या सुरू ठेवल्यानं, चाकरमान्यांना तब्बल 18 तासांचा प्रवास करावा लागत आहे. लोक सावंतवाडीपर्यंत पोहोचणार केव्हा? म्हणजे चाकरमान्यांनी तीशने रुपायंचं तिकीट काढून मुंबईतून यायचं आणि स्टेशनला उतरल्यावर एक हजार रुपयांची रिक्षा करून घरी जायचं का? असा प्रश्नही आता काही संघटनांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; एक ठार, 19 जखमी )

 

- Advertisment -