घरपालघरविसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा वैतरणा नदीत बुडून मृत्यू; पालघरमधील घटना

विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा वैतरणा नदीत बुडून मृत्यू; पालघरमधील घटना

Subscribe

गणपती विसर्जन करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल, 20 सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील वाडा येथील आहे. जगत नारायण मौर्य ( वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (25) यांचा कोनसई येथील नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर प्रकाश नारायण ठाकरे ( वय 35) हे गोऱ्हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत.

पालघर: गणपती विसर्जन करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल, 20 सप्टेंबरला संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील वाडा येथील आहे. जगत नारायण मौर्य ( वय 38), सुरज नंदलाल प्रजापती (25) यांचा कोनसई येथील नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर प्रकाश नारायण ठाकरे ( वय 35) हे गोऱ्हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत. (Ganeshotsav 2023 Three who went for immersion drowned in Vaitarana River Incidents in Palghar Wada )

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबरला सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं कोनसई येथील नाल्यात दोघांचा तर गोऱ्हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन केलं जात होतं. त्यामुळे काल, 20 सप्टेंबरला काहींनी गणेशाचे विसर्जन केले. पण, वाडा येथे दोन दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जन करताना काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

तरुणाचा शॉक लागून मृत्यू

श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीत हातातील झेंड्याचा लोखंडी रॉडचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओडिसा राज्यातील कटक येथे ही घटना घडली. मृत्यू झालेला तरुण बुलडाणा तालुक्यातील डोंगरशेवली येथील रहिवासी असून, सोहम भगवान सावळे (24) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

सोहम कटक येथे MPSC आयोगाचे शिक्षण घेत होता. 19 सप्टेंबर रोजी गणेश आगमनाच्या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. एका मोठ्या वाहनातून मिरवणूक सुरू असताना सोहम हातातील भगवा ध्वज फडकवत होता. त्याच वेळी वरून जाणाऱ्या विजेच्या तारांना त्याच्या हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाला आणि काही क्षणात तो खाली कोसळला. त्याला स्थानिक रुग्णालयामध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ देखील कॅमेऱ्यात कैद झाला असून तो ह्रदय हेलावणारा आहे. या घटनेमुळे बुलडाण्यासह डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली आहे.

(हेही वाचा: मुंबई, पालघरमध्ये आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची माहिती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -