Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गणेशोत्सवात गर्दी वाढल्याने पुन्हा कडक निर्बंध लागणार! - राजेश टोपे

गणेशोत्सवात गर्दी वाढल्याने पुन्हा कडक निर्बंध लागणार! – राजेश टोपे

Related Story

- Advertisement -

गणेशभक्त दरवर्षी गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. हा सण सर्वांचा आवडता असून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र गणेशोत्सवात गर्दी वाढल्याने कोरोना संसर्गाची भिती वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात कोरोना नियमांचे पालन करून गणेशभक्तांनी हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन नागरिकांना केले. यासह कोविड अनुषंगिक वर्तवणुक शंभर टक्के पाळावी, अशी नम्र विनंती देखील त्यांनी केली. तसेच महाराष्ट्र हे एक सुसंस्कारी राज्य आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या बाबींकडे सर्व गणेशभक्त काळजीपूर्वक लक्ष देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जर गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात गर्दी वाढल्याने पुन्हा कडक निर्बंध लागणार असा इशारा देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

राज्यातील पुणे, मुंबई, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी सत्तर टक्के रुग्ण या जिल्ह्यांमध्ये असल्याने कोरोना सुसंगत वर्तन, लसीकरणाला प्राधान्य आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहेच, मात्र इतर शहरात देखील कोरोनाचे नियमांचे पालन करणं आवश्यक आहे, असे केल्यास नक्कीच कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच आपण सध्या १२ लाखाच्या वरती लसीकरण करत असून १५ ते ३० लाखापर्यंत दिवसाला लसीकरण करण्याची आपली तयारी आहे, मात्र यासाठी केंद्र सरकारने लसींचा साठा वाढवायला हवा असही ते म्हणाले. लसीककरण झाल्यानंतर कोरोनाची तिसरी लाट आली तरी तिचा संसर्ग कमी प्रमाणात होतो आणि त्यामुळे आपण तिसरी लाट थोपवू शकतो त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचही ते म्हणाले. त्यामुळे जास्तीत जास्त कोरोना लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

- Advertisement -

सध्या ऑक्सिजन निर्मिती १४०० मेट्रिक टन पर्यंत पोहचली आहे तसेच ऑक्सिजनचे नवे २०० ते २५० प्लँट तयार केले असून २ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचा आपला मानस असल्याचही राजेश टोपेंनी यावेळी सांगितलं. तिसऱ्या लाटेचा अंदाज केंद्र सरकार लावत असून तो आकडा मोठा असल्याचे सांगितले जात आहे आणि हा आकडा खरंच वाढता असला तर आपल्याला ऑक्सिनची कमतरता नक्की भासू शकते. जर ७०० मेट्रीक टनाच्या वरती ऑक्सिजनची गरज भासली तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लॉकडाऊन करावा लागेल, निर्बंध लावावे लागतील असे मतं आज आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केले आहे.


‘मोदी एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा! गणपतीची आरती म्हणत चाकरमानी मुंबईहून कोकणात रवाना

 

- Advertisement -