Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2022 राज्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला; राज ठाकरेंकडून शासकीय यंत्रणांचे आभार

राज्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला; राज ठाकरेंकडून शासकीय यंत्रणांचे आभार

Subscribe

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सणांवरील निर्बंध हटवले. त्यामुळे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्ष गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सणांवरील निर्बंध हटवले. त्यामुळे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाची आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या. त्यामुळे सर्व गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गणेशोत्सव जल्लोषात साजरा केल्याने सर्व शासकीय यंत्रणांचे आभार मानले आहेत. (Ganeshotsav was conducted smoothly in the state Thanks to the government agencies from Raj Thackeray)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर शासकीय यंत्रणांचे आभार मानले आहेत. “राज्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. कोरोनानंतरचा हा पहिला मोठा सण. हा सण अतिशय उत्सहात पार पडला, आणि तो देखील कोणतेही गालबोट न लागता. ह्याला महाराष्ट्र पोलीस, विविध महापालिका, आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन दलाचे मनापासून आभार”, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

“उत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील अगदी कॉन्स्टेबल ते राज्याच्या पोलीस महासंचालकांपर्यंत आणि महापालिका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे सफाई कर्मचारी ते अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाप्रती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय कृतज्ञ आहे”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

दोन वर्षांनंतर गणेशोत्सव उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या गणेशनगरीत म्हणजेच लालबाग-परळ परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे मंडळांमध्ये स्वागत करण्यात आले. दरम्यान, राज्यातील नव्या शिंदे-फडणवीस सरकारने सर्व सणांवरील निर्बंध हटवल्याने सर्व स्तरावरून सरकारचे कौतुक करण्यात आले.


- Advertisement -

हेही वाचा – ज्ञानवापी मशिदीप्रकरणी पुढील सुनावणी होणार २२ सप्टेंबरला, मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -