घरक्राइमक्रौर्याची परिसीमा : मदतीच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार, पीडितेची प्रकृती गंभीर

क्रौर्याची परिसीमा : मदतीच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार, पीडितेची प्रकृती गंभीर

Subscribe

मदतीचे आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान आरोपीकडून गुन्हायसाठी वारलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पीडितेची प्रकृती बिकट असून नागपूरमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर अटक आरोपींना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय घडले –

- Advertisement -

पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने तिने रात्री बहिणीचे घर सोडले. गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्याच्या बहाण्याने ती निघाली होती. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. मात्र, आरोपीने तिला घरी सोडले नाही. गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, त्याने दुसऱ्या दिवशीही 31 जुलैला पळसगाव जंगलात नेऊन पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीने पळ काढला.

पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या (आरोपी 2) आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानंतही घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडितेवर अत्याचार केले. आरोपीने आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला.

- Advertisement -

पीडीतेची अवस्था गंभीर –

भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीतेची अवस्था गंभीर आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे. सुरुवातीला तिला भंडारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -