Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Pune Crime : पुण्यात गुन्हे सत्र थांबेना, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Pune Crime : पुण्यात गुन्हे सत्र थांबेना, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Subscribe

मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune Crime) प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील वाघोली परिसरात प्रेम प्रकरणातून एका प्रेयसीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (gang rape) करण्यात आल्याची घटना कोंढवा येथे घडली आहे. ही बाब शाळेत सुरू असलेल्या समुपदेशन प्रकारातून पुढे आली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही येवलेवाडी येथे राहते. ही घटना येवलेवाडीत २०१८ ते २०१९ दरम्यान घडली. ती मुलगी ६ वी किंवा ७ वीमध्ये असताना घराशेजारील गल्लीत खेळत होती. पण एका घराच्या खिडकीतून कुठलीतरी वस्तू खाली पडली आणि ती वस्तू देण्यासाठी ती मुलगी घरी जात होती. त्याचक्षणी आरोपींनी मुलीला घरात ओढून घेतले. त्यानंतर आतून कडी लावली. तिच्या रडण्याच्या आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

- Advertisement -

दरम्यान, ही गोष्ट कुणाला सांगायची नाही, नाहीतर तुझ्या घरच्यांचेही खूप हाल करू, अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे आजपर्यंत तिने या प्रकरणाचा खुलासा केला नव्हता. मात्र, फिर्यादी ही तिच्या शाळेत असतांना मुलींचे समुपदेशन सुरू होते. यावेळी तिने तिच्यावर घडलेला हा प्रकार शिक्षकांना सांगितला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रेयसीनं प्रियकराला संपवलं

पुण्यात प्रेम प्रकरणातून एका प्रेयसीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना ३१ मे रोजी वाघोली परिसरात घडली होती. पोलिसांनी या घटनेची तपासणी केली असता, या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं. तसेच या प्रकरणात हत्या करणाऱ्या प्रेयसीला अटक करण्यात आली.

- Advertisement -

प्रेयसी आणि प्रियकराचं नाव अनुजा आणि यशवंत आहे. हे दोघेही एकमेकांना ओळख होते. मात्र यशवंत हा तिला सारखा त्रास देत होता आणि तिच्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले. हे वाद इतके टोकाला गेले की, प्रेयसीने प्रियकरावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करुन हत्या केली होती. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. प्रियकराची हत्या केल्यानंतर तिने देखील स्वत:च्या हाताची नस कापून घेतली होती. मात्र, वसतिगृहातील मुलांमुळे तिचा जीव वाचला. दोघेही वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते.

दिल्लीतही घडला धक्कादायक प्रकार

नवी दिल्लीतील शाहबाद डेअरी या परिसरात एका 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला 40 वेळा चाकूने भोसकले आणि नंतर तिला दगडाने ठेचून मारले (Delhi Sakshi Murder Case). गजबजलेला परिसर असतानाही रस्त्याने जाणाऱ्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. या निर्घृण हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणातील आरोपीने दिल्ली पोलिसांनी आरोपीला बुलंदशहर येथून अटक केली. त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून आपल्याला या कृत्याबद्दल अजिबात पश्चाताप नसल्याचे त्याने सांगितले.


हेही वाचा : Pune Crime News : पुण्यात प्रेयसीनं प्रियकराला संपवलं, धक्कादायक कारण आलं


 

- Advertisment -