घर महाराष्ट्र लासलगावातील गँगवॉरमुळे स्थानिकांमध्ये भीती

लासलगावातील गँगवॉरमुळे स्थानिकांमध्ये भीती

Subscribe

नाशिक जवळील लासलगावमध्ये गुंड प्रवृत्ती वाढतांना दिसत आहे. येथे होत असलेल्या गँगवॉर मुळे स्थानिक नागरिंकामध्ये भितीचे वातावरण आहे.

अवैध धंद्याच्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवार ने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आणि कोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पड़ने मुश्किल झाल्याचे नागरिक बोलत आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आणि तलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला.

पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे ही मागणी

लासलगाव व परिसरात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ही येथील बाजार तळामध्ये अशा अनेकदा घटना घडल्या आहे. सायकंळ च्या वेळी बाजार तळामधून महिलांना जाणे मुश्कील झाले आहे. याच रस्त्यांमधून शाळा-कॉलेजमध्ये मुला-मुलींचा जाण्याचा मार्ग असल्याने पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

चार चाकी वाहनांची तोडफोड

- Advertisement -

लासलगाव येथील बाजारतळात जानेवारी २०१७ मध्ये सायंकाळी साडे पाच वाजेदरम्यान काही अज्ञात इसमाणी विंचुर येथील एका शेतकरी हे आपल्या चारचाकी गाडीने जात असताना परिसरातील गुंडानी त्याचे एकत्र येत तेथे ऊभ्या असलेल्या चार चाकी वाहनांची तोडफोड करुण गाडीची काच फोडत दहशत निर्माण केली होती.

पुन्हा गँगवार

लासलगाव व परीसरात या टोळीपासुन अनेकांना ञास होत आहे आता तर त्यांनी वाहनांची मोडतोड करण्याचा धडाका लावुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याआधीही १ फेब्रूवारी २०१६ रोजी अशाच प्रकारे अनेक वाहनांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये असाच प्रकार घडला होता. लासलगाव मध्ये त्यांच्या वाढत चाललेल्या कारवाया पाहता पोलीसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरीक करीत आहेत.

- Advertisement -

“येथील बाजारतळामध्ये सायंकाळच्या वेळेस दारुड्यांची इतकी गर्दी असते की येथून महिलांना जाणे-येणे सुद्धा मुश्किल झाले आहे.त्यात खुलेआम तलवारी कोणते काढून दहशत माजवन्याचे प्रकार सुरू आहे.यूपी बिहार सारखे प्रकार गावात घडू लागल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.” – स्थानिक महिला

- Advertisment -