घर महाराष्ट्र जागरूकपणानं भूमिका घ्यायचं काम गणपतरावरावांनी अखंडपणानं केलं - शरद पवार

जागरूकपणानं भूमिका घ्यायचं काम गणपतरावरावांनी अखंडपणानं केलं – शरद पवार

Subscribe
शेकापचे (Shekap) दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख (late leader Bhai Ganpatrao Deshmukh) यांच्या स्मारकाच्या अनावर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DSM Devendra Fadnavis) हे दोन्ही नेते आज सोलापूरातील सांगोला येथे एकाच मंचावर आले होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख यांनी जागरूकपणानं भूमिका घ्यायचं काम अखंडपणानं केलं. (Ganpat Rao did the work of taking a stand with awareness – Sharad Pawar)
शरद पवार म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातल्या दाभाडी याठिकाणी काँग्रेस दत्ता देशमुख आणि काही सहकाऱ्यांनी मिळून एक प्रबंध लिहिला आणि त्या प्रबंधामधून भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा जन्म झाला. शेकाप पक्षाचा जन्म झाल्यानंतर काही जिल्हे या विचाराला अतिशय शक्ती देणारे होते. मग ते उस्मानाबाद, परभणी, नाशिक किंवा सोलापूर असेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोक लाल झेंडा खांद्यावर घेऊन शेतकरी कामगार पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न अखंडपणानं करत होते. त्यातून काही नेते पुढे आले. या नेत्यांमध्ये गणपतराव देशमुखांच नाव घ्यावं लागेल, असं शरद पवार म्हणाले.
माझं सगळं घर हे शेकाप पक्षाचं होतं तर, मी मी काँग्रेसच्या विचाराचा होतो. त्यावेळेला गणपतराव देशमुख आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांकडे आमच्या कुटुंबियांचं येणं जाणं असायचं. अनेक लहान मोठ्या प्रश्नावरून होणाऱ्या संघर्षात माझ्या घरातले सगळे लोक सहभागी व्हायचे. दुष्काळ पडला तर काम द्या, पैसे वाढवून द्या, शेतीमालाच्या किमती वाढवून द्या. या सगळ्या गोष्टी लहानपणापासून मी माझ्या घरात बघितलेल्या आहेत.

सांगोल्याच्या जनतेनं गणपतरावांना अखंडपणानं काम करण्याची संधी दिली

मी एकोणीसशे सदुसष्ठला आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत विधानसभा नाहीतर लोकसभा नाहीतर राज्यसभा कुठे ना कुठेतरी आहे. पण दुर्दैवानं गणपतरावांना दोन वेळेला पराभव पत्करावा लागला. तेवढा दोन वर्षाचा कालावधी संपला तर, या मतदारसंघामध्ये अखंडपणानं काम करण्याची संधी सांगोल्याच्या जनतेनं गणपतरावांना दिली. मी राज्याचा प्रमुख असताना माझ्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी ही त्यांना मिळाली.

खातं नसलं तरी जागरूकपणानं भूमिका घ्यायचं काम गणपतरावांनी अखंडपणानं केलं

मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे शेतकरी खातं होतं, पण ते राज्याचा विचार करायचे. मी अनेकदा बघितलं की कष्टकरी कामगारांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीचा एखादा कायदा किंवा प्रश्न असला की, गणपतराव त्याबाबतीत अत्यंत जागरूक असायचे. एक दिवस मी त्यांना विचारलं, तुम्ही दुष्काळी भागातून येता. सांगोला तालुका दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे, पण कामगारांच्या कामात तुम्ही इतकं कसं लक्ष घालता? त्यांनी सांगितलं मुंबईच्या बंदरामध्ये या तालुक्याचे लोक फार मोठ्या प्रमाणावर काम करतात. त्यांचं दुखणं काय आहे? हे समजून ते कमी करण्याचा ते प्रयत्न करायचे. भलेही ते खातं त्यांच्याकडे नसलं तरी जागरूकपणानं भूमिका घ्यायचं काम अखंडपणानं गणपतरावांनी केलं, असे शरद पवार म्हणाले. 
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -