गणपती बाप्पा मोरया! एकनाथ शिंदे सिद्धिविनायक चरणी नतमस्तक

आजपासून मुख्यंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले असून त्याआधी त्यांनी बाप्पाचरणी लीन होऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महत्त्वाचे पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते.

Angarki Sankashti Chaturthi 2021: Crowd of devotees at Siddhivinayak Temple

मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने कालच विधानसभेत बहुमत सिद्ध केले. त्यानंतर आजपासून मुख्यंत्री एकनाथ शिंदे कामाला लागले असून त्याआधी त्यांनी बाप्पाचरणी लीन होऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महत्त्वाचे पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते. (Ganpati Bappa Morya! Eknath Shinde Siddhivinayak Charani Natmastak)

सिद्धिविनायक मंदिरात सदा सरवणकर, दीपक केसरकर यांच्यासह शिंदे गटातील महत्त्वाचे आमदार घेऊन एकनाथ शिंदेंसोबत होते. तसेच, मंदिरातील गुरुजींनी नव्या मुख्यमंत्र्यांना गणपतीचं मानाचं नारळ आणि शाल देऊन स्वागत केलं.

२० जूनपासून राज्यात सत्तानाट्य सुरू होतं. महाविकास आघाडीसोबत वाद झाल्याने शिवसेनेने महाविकास आघाडीची साथ सोडावी असं एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी बंड पुकारत राज्यातील सेनेत नवा गट स्थापन केला. अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर पडावं लागंल. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. अखेर भाजपने शिंदेंसोबत युती करून सत्ता स्थापन केली.