गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ केली आहे. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त डब्यांचे आरक्षण गुरूवारपासून, आजपासून खुले होणार आहे. त्यामुळे गपणतीला गावी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Ganpati Festival Konkan Extra coaches to Diva Sawantwadi Express Kashedi Ghat )
गाडी क्रमांक 101405/6 दिवा सावंतवाडी एक्स्प्रेसला तृतीय श्रेणी वातानुकूलितचे तीन डबे जोडण्यात येणार आहेत. सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसला 15 सप्टेंबर आणि दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला 16 सप्टेंबरपासून प्रवाशांना अतिरिक्त डब्यातून प्रवास करता येणार नाही. यामुळे दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेस आता दोन तृतीय वातानुकूलित, 10 द्वितीय श्रेणी, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन अशा संरचनेसह धावणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर 156 गणपती विशेष रेल्वे
कोणत रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी 156 गणपती विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्लं झालं असल्यानं आता जादा गाड्या धावणार असल्याानं प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. रेल्वे मार्गावर मुंबई-सावंतवाडी रोड नियमित 40 फेऱ्या आहेत.
कशेडी बोगदा सुरू होणार
कशेडी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या गणोशोत्सवाआधी हा बोगदा सुरु होण्याची शक्यता आहे. यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होण्याची शक्यता आहे. केशडी बोगदा सुरु झाल्यास गणोशोत्सवात चाकरमान्यांचे हाल होणार नाहीत. कारण केशडी घाटाचे अंतर पूर्ण करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ लागतो. त्यात घाटात वळणावळणाचे रस्ते आहेत. घाटात एखादी गाडी बंद पडली तर येथील सर्वच वाहतूक ठप्प होते. तासंतास वाहतूक खोळंबते. पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती अधिक असते. त्यामुळे गणेशोत्सवात या मार्गावरुन जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होतात. मात्र हा बोगदा तयार झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
(हेही वाचा: मुंबईतील ‘बडे मिया कबाब रेस्टॉरंट’वर FDA चा छापा; धक्कादायक बाब उघड )