Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र बाप्पाने कोरोनासोबत काहींच्या मनातील द्वेषाचे रोग दूर करावेत - छगन भुजबळ

बाप्पाने कोरोनासोबत काहींच्या मनातील द्वेषाचे रोग दूर करावेत – छगन भुजबळ

Related Story

- Advertisement -

मुंबईतील अंजिरवाडी गणेशोत्सव मंडळाच्या गणारायची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. यावेळी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना बाप्पाने कोरोनाच्या रोगासमोबत काहींच्या मनातील द्वेषाचे रोग दुर करावेत, अशी प्रार्थना केली, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळई त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या कारवायांवर देखील भाष्य केलं.

गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना केली कोरोना दूर करा. त्यानंतर कोरोना दूर झाल्यावर काही लोकांच्या मनामध्ये असलेला द्वेषाचा रोग दूर करा. सगळ्यांना जरा निरोगी करा. शारीरिकदृष्ट्यासुद्धा आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा…, अशी प्रार्थना केली असं छगन भुजबळ म्हणाले.

सीबीआय आणि ईडी केंद्राच्या बाहुल्या

- Advertisement -

सर्वोच्च न्यायलय म्हणालं होतं की सीबीआय केंद्राची बाहुली आहे. आता ईडी दुसरी बाहुली आहे, असं छगन भुजबळ म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा केव्हाही दुरुपयोग झाला नव्हता, असं देखील भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्र सदन घोटाळा : कोर्टाकडून छगन भुजबळ दोषमुक्त

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कोर्टाकडे दोषमुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातून आपली नावे वगळण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे कोर्टाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी अर्जात म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी कोर्टाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -