घरमहाराष्ट्रगोळीबार, लाठीमार, अपहरण तरी कारवाई नाहीच; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

गोळीबार, लाठीमार, अपहरण तरी कारवाई नाहीच; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

Subscribe

वारकरी, बारसू आणि त्यानंतर आता मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. तरीही कोणतीही कारवाई नाही. इतकचं काय तर गद्दार आमदाराने गणपतीत गोळीबार केला, दुसऱ्या गद्दार आमदाराच्या मुलानं किडनॅपिंग केलं तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

राज्यात सध्या गद्दारांचं सरकार आहे. सरकारने ज्या काही सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या आहेत त्या केवळ होर्डिंग्जवर आहेत. शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पुरेशी मदत पोहोचलेली नाही. वारकरी, बारसू आणि त्यानंतर आता मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. तरीही कोणतीही कारवाई नाही. इतकचं काय तर गद्दार आमदाराने गणपतीत गोळीबार केला, दुसऱ्या गद्दार आमदाराच्या मुलानं किडनॅपिंग केलं तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे हे आज मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बंड केलेल्या आमदारांवरही सडकून टीका केली आहे. (Ganpati Shooting lathicharge on Maratha reservation Barasu Aditya Thackeray s indirect attack on Devendra Fadnavis)

- Advertisement -

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

या सरकारच्या काळात वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. कोकणात बारसू प्रकरणात महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला. इतकचं काय आता जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवरही लाठीचार्ज केला गेला. त्यावरही कोणतीही कारवाई केली गेली नाही. केवळ या प्रकरणांत फक्त IPS, IAS अधिकाऱ्यांना निलंबित केलं जाईल, पण जनरल डायर कोण हे सांगणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मागच्या वर्षी गणपतीत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या गोळीबार प्रकरणावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की या प्रकरणात त्यांचचं बंदूक असूनही या गद्दार आमदाराचं साधं लायसन्सही जप्त केलं गेलं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

सोबतच त्यांनी प्रकाश सुर्वेंच्या मुलाने एका व्यवसायिकाचं अपहरण केल्याचा आरोप होता, तसं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. यावरून देखील आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं. त्या प्रकरणातही काहीही झालं नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गृहमंत्रालयाच्या त्रुटींवर बोट ठेवलं.

(हेही वाचा: केंद्रात-राज्यात स्पष्ट बहुमत असूनही…, आरक्षणावरून रोहित पवार यांचा हल्लाबोल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -