घर गणेशोत्सव 2022 गणेश विसर्जनानंतर राजकिय नेत्यांकडून समुद्र किनाऱ्यांची सफाई

गणेश विसर्जनानंतर राजकिय नेत्यांकडून समुद्र किनाऱ्यांची सफाई

Subscribe

मुंबईत अनंत चतुर्दशीला म्हणजे काल दहा दिवसांच्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. वाजत-गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मात्र, विसर्जनानंतर जमा होणाऱ्या निर्मल्यांची व इतर कचऱ्याची स्वच्छता आज विविध राजकीय नेते आणि संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली.

मुंबईत अनंत चतुर्दशीला म्हणजे काल दहा दिवसांच्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. वाजत-गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मात्र, विसर्जनानंतर जमा होणाऱ्या निर्मल्यांची व इतर कचऱ्याची स्वच्छता आज विविध राजकीय नेते आणि संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यानुसार, गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी सफाई केली. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दादर चौपाटीवर साफसफाई केली. तसेच, जुहू चौपाटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला. (Ganpati visarjan cleanliness campaign after immersion political leaders clean beach)

गणपती विर्सजन झाल्यानंतर गिरगांव चौपाटी येथे जमा होणाऱ्या निर्मल्यांची व इतर कचऱ्याची स्वच्छता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईड यांच्यामार्फत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे 400 सभासद एन.सी.सी. मधील 1500 मुले व मुली आणि अधिकारी असे एकूण सुमारे दोन हजार सभासद सहभागी झाले होते.

- Advertisement -

10 दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबवणार असल्याचे स्पष्ट केले होते. एवढेच नाहीतर किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष गोळा करून ते महापालिकेकडे सोपवण्यातही आले आहे. सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी स्वच्छता मोहिमेवेळी मनसेचे अमित ठाकरेही उपस्थित होते.

यंदा गणेश उत्सवामध्ये गणेश भक्तांचा उत्साह दिसून आला अगदी त्याप्रमाणेच स्वच्छता मोहिमेतही गणेश भक्त रस्त्यावर उतरले होते. तर याच भक्तांचा उत्साह वाढवण्याचे काम राजकीय नेते आणि इतरांनी केले आहे. जुहू चौपाटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला.


- Advertisement -

हेही वाचा – घुसमट होत असेल तर कॉंग्रेसमध्ये या, आम्ही साथ देऊ…नाना पटोलेंची नितीन गडकरींना ऑफर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -