मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसापूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी आणि त्याच्या कुटुंबियांना नेटकऱ्यांनी चांगलेच टार्गेट केले होते. मात्र, वेळ आल्यावर यावर बोलेल असा म्हणाऱ्या गश्मीरने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून नेटकऱ्याचं लक्ष वेधलं आहे.(Gashmeer Mahajani Gashmeer Mahajanis post goes viral Shared dream)
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना नेटकऱ्यांनी विविध आरोप करत कटघऱ्यात उभे केले होते. त्यावर गश्मीर महाजनी यानी प्रत्येकवेळी याला वेळ आल्यावर उत्तर देणार असे म्हटले होते. यादरम्यान आता त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्याला लहानपणापासून पडत असलेल्या स्वप्नाचा उलगडा केला आहे.
काय गश्मीरच्या पोस्टमध्ये?
अभिनेता गश्मीर महाजनी हा उमदा कलावंत असून, त्यांने त्याचे वडिलांनी काम केलेल्या चित्रपटातही काम केले आहे. त्यांने इंस्टाग्रावर केलेली पोस्ट जशाच्या तशी.
एक स्वप्न आहे. ते रोज येतं. कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या मानगुटीवर बसून राहतं. मी म्हणतो जा बाबा, माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत! पण ते काही हलत नाही, जणू त्याचं माझ्याविना कुणीच नाही. मी काही देणं लागतो त्याचं असं म्हणतं ते मला. माझंच स्वप्न आहे ते. लहानपणापासून पाहायचो. तरुण होतं तेव्हा खूप उद्दाम होतं. म्हातारं झालं आणि लाचार झालं, अशी स्टोरी गश्मीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
हेही वाचा : लागेल तेवढा वेळ घ्या पण आरक्षणच द्याच; उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगेची भूमिका
पुन्हा एकदा तोच प्रवास…लवकरच
इंस्टाग्रामवर पोस्ट करत गश्मीरने त्याच्या स्वप्नाचा उलगडा केला आहे. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. तो त्याच्या चाहत्यांसाठी आस्क गॅश हे सेशनही करतो. तो पुढील काळात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याने आगामी प्रोजेक्टविषयी माहिती देताना त्यानं पोस्टमध्ये लिहिले आहे की, पुन्हा एकदा तोच प्रवास…लवकरच.
हेही वाचा : लागेल तेवढा वेळ घ्या पण आरक्षण द्याच; उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगेची भूमिका
या चित्रपटांमध्ये केले गश्मीरने आतार्यंत काम
गश्मीरनं काही मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सरसेनापती हंबीरराव, देऊळ बंद, कान्हा आणि कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपटांमध्ये गश्मीरनं काम केलं. तसेच त्यानं तेरे इश्क में घायल, इमली या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं. आता गश्मीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.