विराट सभेसाठी पैसे वाटून गर्दी जमवली? मनसे आणि भाजपकडून चंद्रकांत खैरेंचा फोटो पोस्ट

विराट सभेतील गर्दी पैसे देऊन जमवल्याचा आरोप केला जातोय. मनसे नेते अमेय खोपकर आणि भाजप नेते नितेश राणे यांनी चंद्रकांत खैरे यांचा फोटो ट्विट करून हा आरोप केला आहे.

chandrakant khaire

राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबादमध्ये विराट सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या सभेला विक्रमी गर्दी जमल्याचा दावा शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, ही गर्दी पैसे देऊन जमवल्याचा आरोप केला जातोय. मनसे नेते अमेय खोपकर आणि भाजप नेते नितेश राणे यांनी चंद्रकांत खैरे यांचा फोटो ट्विट करून हा आरोप केला आहे. (Gathered crowd by distributing money for Virat Sabha? Photo post of Chandrakant Khaire from MNS and BJP)

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांना टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट अबू आझमींकडून आली, मनसेचा हल्लाबोल

बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची सभा संपताच मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत शिवसेना आणि चंद्रकांत खैरेंवर निशाणा साधला. ‘चंदू खैरे सभेआधी पैसे वाटताना… चंदू खैरेंचा ‘आक्रोश’ – सभेसाठी या रे’, असं ट्विट करत त्यांनी फोटो पोस्ट केला.


दरम्यान, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही सभेतील एक व्हिडिओ पोस्ट करत विराट सभेवर हल्लाबोल केला. रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी विराट? सभा? स्वाभिमान? छ्या, असं ट्विट केलं आहे.

अमेय खोपकर आणि राजू पाटील यांनी ट्विट केल्यानंतर आज सकाळी भाजप नेते नितेश राणे यांनीही ट्विट कंल आहे. विराट सभेचा फॉर्म्युला असं कॅप्शन टाकत त्यांनी चंद्रकांत खैरेंचा फोटो पोस्ट केला आहे.


शिवसैनिक आक्रमक

चंद्रकांत खैरेंचा फोटो पोस्ट होताच शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कोरोना काळात मुलगा गमावलेल्या निराधार व्यक्तीला आर्थिक मदत करतानाचा हा फोटो असल्याचं चंद्रकांत खैरेंच्या समर्थकांकडून सांगण्यात येतंय.

हेही वाचा – बाळासाहेबांनी दिलेलं वचन मी पूर्ण करणार, नामांतरावरून मुख्यमंत्र्यांचा औरंगाबादकरांना दिलासा