घरताज्या घडामोडीगाैरी-गणपतीसाठी राज्यातून १७७१ एसटी गाड्यांचे बुकिंग

गाैरी-गणपतीसाठी राज्यातून १७७१ एसटी गाड्यांचे बुकिंग

Subscribe

यंदा मुंबई प्रदेश अंतर्गत आतापर्यंत १६८२ एसटीचे बुकिंग झाले.

गाैरी-गणपती म्हटल्यावर चाकरमान्यांना गावाचे वेध लागतात. अशावेळी चाकरमान्यांचा अधिकाधिक कल हा एसटीकडे असताे. लालपरी राज्याच्या कानाकाेपऱ्यात धावत असल्याने चाकरमान्यांच्या घरापर्यंत पाेहचत असते, शिवाय एसटीचा प्रवास हा सुखकर असताे. परिणामी, चाकरमानी एसटीची आगामी बुकिंग करतात अथवा ग्रुप आरक्षण करतात. गतवर्षी कोविड व कडक निर्बंधामुळे बहुतांशी चाकरमान्यांनी गाैरी-गणपती उत्सवाकडे पाठ फिरवली हाेती. यंदा मात्र शिथिल करण्यात आले आहेत. तसेच अनेक नागरिकांचा लसीचा पहिला व दुसरा डाेस पूर्ण झाला आहे. त्यामुळे एसटी आरक्षणामध्ये वाढ झाली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा मुंबई प्रदेश अंतर्गत आतापर्यंत १६८२ एसटीचे बुकिंग झाले असून पुणे प्रदेश अंतर्गत ८९ बुकिंग झाले आहे. त्यामुळे २५ ऑगस्टपर्यंत एकूण १७७१ एसटीचे बुकिंग झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

गाैरी-गणपती सण राज्यात माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. मागील दीड वर्ष काेराेना काळात उत्सव साजरे करण्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, यंदा गाैरी-गणपतीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली असल्याचे समाेर येत आहे. यंदा रेल्वे तसेच इतर खासगी वाहनांची बुकिंग फुल्ल झाली आहे. त्याचबरोबर एसटीचे आरक्षण फुल्ल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. २४ ऑगस्टपर्यंत राज्यात १७७१ गाड्यांचे बुकिंग झाले आहे. येत्या काही दिवसात एसटीची अजून बुकिंग हाेण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गाैरी-गणपतीसाठी एसटीच्या बुकिंग दिवसेंदिवस वाढत आहेत. येत्या काही दिवसात ही बुकिंग आणखी वाढण्याची शक्यता आहे. गावी जाण्याच्या बुकिंग बराेबरच पुन्हा येतानाचीही बुकिंग हाेत आहे. ही बाब दिलासादायक आहे.
– अभिजीत भाेसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -